पुसद येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखा फलकाचे अनावरण

54

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.29डिसेंबर):-वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड .बाळासाहेब आंबेडकर व रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या धेय्य धोरणानुसार तसेच धनजंय गायकवाड जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा व डी.के.दामोदर जिल्हा महासचिव यांच्या आदेशानुसार व बुद्धरत्न भालेराव तालुकाध्यक्ष पुसद यांच्या नेतृत्वाखाली आज पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज वार्ड येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन पदमा दिवेकर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी ह्या होत्या.तर प्रमुख उपस्थिती म्हणुन रेखा पाईकराव जिल्हा महासचिव,वंदना भवरे जिल्हा उपाध्यक्षा व विजय लहाने जिल्हा मीडिया प्रमुख, सीमा असोले ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

या फलकाचे अनावरण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या विमलताई गजभिये यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले.वंचित बहुजन महिला आघाडी छत्रपती शिवाजी महाराज वार्ड शाखा अध्यक्षपदी रत्नमाला थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

डी.के.दामोदर जिल्हा महासचिव व मार्शल विनोद बरडे सर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे ध्येयधोरण व येणाऱ्या निवडणूकीसंदर्भात मार्गदर्शन केले.आजच्या शाखा फलकाचे वैशिष्ट्ये म्हणजे या महिला शाखा कार्यकारिणी मध्ये सर्व जाती धर्माच्या तब्बल ६० महिलांची जम्बो कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

या कार्यक्रमाला संतोष जोगदंडे अध्यक्ष उमरखेड तालुका,शेख अश्फाक शेख आगा अध्यक्ष तालुका महागाव,मधुकर सोनुने,प्रसाद खंदारे, प्रकाश खिल्लारे,शशांक खंदारे,दादासाहेब जोगदंडे व वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जनार्धन गजभिये यांनी केले तर आभारप्रदर्शन विद्या नरवाडे यांनी केले.