निरपराध व्यक्तींवर होत असलेली कार्यवाही तात्काळ थांबवा- वंचित बहुजन आघाडी

36

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.30डिसेंबर):- शहरामध्ये दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह विधान मुस्लिम समाजाबद्दल केल्यामुळे आणि या घडलेल्या घटनेसंबंधी निरपराध व्यक्तींवर होत असलेली कार्यवाही तात्काळ थांबवा.
अशा मागणी निवेदन वंचित बहुजन आघाडी ने आज केले आहे.

उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी. के दामोधर, तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे, युवराज बंडगर शहर महासचिव उमरखेड, देवानंद पाईकराव रिपब्लिकन सेना युवा जिल्हा कार्याध्यक्ष, राजीव खंदारे, बाबुराव नवसागरे ज्येष्ठ नेते दादासाहेब जोगदंडे, गौतम कांबळे, संदीप राऊत इत्यादी उपस्थित होते.