पुसद येथे भिमाकोरेगाव ५०० शूरवीरांना बुध्द भीम गीताद्वारे मानवंदना

33

🔹भिम टायगर सेना यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम संपन्न

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.3जानेवारी);-भिमा कोरेगाव शौर्यदिनी शुरवीरांना बुध्द ,भीम गीताद्वारे मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भिम टायगर सेना शाखा पुसदच्या वतीने करण्यात आली होते.

१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरुवात, परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य महारांच्या ५०० सैन्याने पेशव्यांच्या अवाढव्य २८००० सैन्यांचा पराभव केला होता.

विजयी ध्वज रोवला होता. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी भिम टायगर सेना शाखा पुसदच्या वतीने शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते . या शुरविराना बुध्द भिम गितातुन मानवंदना देवुन अभिवादन करण्यात आले.

दि. १ जानेवारी २०२२ रोजी पुसद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाजवळ पुसद परिवर्तन बहुउद्देशीय महिला मंडळ छत्रपती शिवाजी वार्ड पुसद यांच्या हस्ते पंचशील त्रिशरण घेण्यात आले.

त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम टी.व्ही.व कॅसेट फिल्म गायक आकाशराजा, धम्मदीक्षा वाहुळे लातुरकर, प्रकाशबाबू कळंबकर यांच्या शांती आणि क्रांतीवर बुद्ध भीम गीतांचा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजक भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर दादा कांबळे यांनी केले होते.
या कार्यक्रमाला भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व मार्गदर्शक दादासाहेब शेळके हे होते . कार्यक्रमाचे उद्घाटक प्रज्ञापर्वाचे माजी अध्यक्ष डॉ.राजेश वाढवे यांनी केले .

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखडे, स्वागताध्यक्ष प्रा.महेश हंबर्डे, पंचायत समिती सभापती छाया अर्जुन हगवणे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस करण ढेकळे, रिपाई आठवले गटाचे शहराध्यक्ष लक्ष्‍मण कांबळे, नागेश कम्प्युटरचे संचालक मिलिंद हट्टेकर. प्रा. गोपाल शेळकीकर, देवेंद्र खडसे, पंचायत समिती सदस्य, शासकीय ठेकेदार नारायण ठोके, किशोर मुजमुले, शशांक भरणे, प्रा.कवी.गायक प्रवीण राजहंस, प्रा.सुधीर गोटे,संदीप कावळे,भारतीय बौध्द महासभा शहराध्यक्ष ल.पु. कांबळे,सुखदेव भगत, अश्विनी पुनवटकर, दशरथ गुढे, राजेंद्र वाघमारे,विनोद फुलमाळी, नगरसेवक साकिब शहा, कपिल वासनिक,विनोद शेंडे, रावण शेंडे, विजय धुळे,शाम मेश्राम,सीमा आसोले,नागसेन मनवर, विशाल राऊत उपस्थितीत होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिम टायगर सेना भिम टायगर सेना महिला आघाडी, भिम टायगर सेना ऑटो अंबुलन्स, अण्णा दोडके, प्रभाकर खंदारे, संजय शेळके, संगपाल कांबळे, तालुकाध्यक्ष, राजकुमार पठाडे ,सिद्धार्थ खडसे, गौतम खडसे, राहुल झिंजारे, विनोद जाधव, राहुल धुळधुळे, महागाव तालुका काळी दौलत सर्कल,भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब शेळके यांच्या हस्ते यावेळी पदनियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये विजय निखाते तालुका कार्याध्यक्ष पुसद, प्राध्यापक महेश हंबर्डे जिल्हा सल्लागार, प्रीतम आळणे शहराध्यक्ष पुसद, गौतम खडसे शहर उपाध्यक्ष पुसद, राजकुमार पठाडे तालुका सचिव पुसद,

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जनार्धन गजभिये यांनी केले. तर आभार गीताताई कांबळे महिला आघाडी भिम टायगर सेना जिल्हाध्यक्षा यांनी केले.