सखाराम बोबडे पडेगावकर यांचा गुंजेगावात शेतकऱ्यांकडून सत्कार

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6जानेवारी):-जिल्ह्यात शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभा आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःला एकट न समजता आपल्या समस्या आम्हाला सांगाव्यात. त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी गुंजेगावं येथे बुधवारी सत्कार समारंभ वेळी बोलताना दिली.

गुंजेगाव परिसरास टाकळवाडी तलावातून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. या तलावातून गुंजेगावं भागात येणाऱ्या चाऱ्या गाळाने भरलेल्या होत्या. त्यात झाडे झुडपे ही वाढली होती. या चाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शेतकरी अधिकाऱ्याकडे गेले असता त्यांनी नकार दिला. शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून ही कामे करावीत असे सांगितले. येथील बळीराम इमडे या युवा शेतकऱ्याने सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर हि बाब घातली. त्यानंतर सखाराम बोबडे व सहका-यांनी घटनास्थळी जाऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करुत असे सांगितले. जलसिंचन विभागाच्या गंगाखेड व परभणी जिल्हा शाखेत संपर्क साधून पंधरा दिवसापूर्वी या चाऱ्या दुरुस्तीचे काम सरकारी खर्चाने सुरू झाले.

या आनंदात गुंजेगाव येथील शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेणारे परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जयवंत कुंडगिर याचा चारीचे दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सत्कार केला. यावेळी अशोक इमडे, पोलिस पाटील त्र्यंबक मोटे, ग्रामपंचायत सदस्य रमेश मोटे, बळीराम इमडे, मारोती मोटे ,गोंरक शेंगटे ,कैलास मोटे ,किसन मामा, विकास इमडे , कालीदास पौळ आदीची उपस्थिती होती.