प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची अर्धापूर तालुका कार्यकारिणी जाहीर

30

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नांदेड(दि.6जानेवारी):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची अर्धापूर तालुका कार्यकारिणी मा.संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष शेख मोला उस्मान शेख यांच्या अध्यक्षतेखाली, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार जाहीर करण्यात आली. नांदेड येथील शासकीय विश्राम ग्रह येथे आयोजित बेठकीत नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष कामाजी अटकोरे, उद्धव मामडे, नांदेड जिल्हा सहसचिव गंगाधर सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस हरविंदर सिंघ संधू, यांच्या समक्ष सर्वानुमते आज रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची अर्धापूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

ती अशी : तालुकाध्यक्ष अनिलकुमार थोरात, तालुका उपाध्यक्ष नारायण राजगोरे, तर सचिव म्हणून कैलास चांगोजी पोलेराव, तालुका सहसचिव, नागोराव पुरभाजी गाडे, तालुका कोषाध्यक्षपदी अनिल संजय इंगोले तर तालुका सदस्य म्हणून गंगाधर पांडुरंग सरपाते यांची निवड करण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.