ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6जानेवारी):-ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात स्थानिक शिवाजी महाराज चौक येथील विश्रामगृहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रा.विजय मुडे, प्रा.उमेशचंद्र मिश्रा, दिलीप शिनखेडे, प्रा.श्याम करंबे, जीवन बागडे, नेताजी मेश्राम यांची उपस्थिती होती. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रा.विजय मुडे, प्रा.उमेशचंद्र मिश्रा, दिलीप शिनखेडे, जीवन बागडे, नेताजी मेश्राम व दीपक पत्रे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनकार्य व आगामी काळातील पत्रकारीता या विषयावर प्रकाश टाकला.

प्रसंगी भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टॉफ बिपीन रावत, जेष्ठ समाजसेविका तथा अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, पत्रकार प्रा.नुरूल अन्सारी, पत्रकार अरविंद चुनाकर यांना ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर यांनी केले. तर आभार ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सहसचिव महेश पिलारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष प्रविण मेश्राम, दिवाकर मंडपे, संतोष पिलारे, अमर गाडगे, शिवराज मालवी, प्रा.चंद्रशेखर गणवीर यांनी अथक परिश्रम घेतले.