घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली

40

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

 🔹असंख्य अनाथांचे छत्र हरपले – सौ. किरणताई बोढे

घुग्घुस(दि.6जानेवारी):-अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्याअनुषंगाने येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पावन स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस मल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे म्हणाल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण केली.

त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे छत्र हरपले आहे.त्यांनी अनाथांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले त्यांचे आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे.यावेळी माजी जिप सभापती सौ. नितुताई चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, कुसुम सातपुते, भाजपाचे संजय तिवारी, मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, तुलसीदास ढवस, सुरेंद्र जोगी, आनंद आसमपेल्ली, मधुकर धांडे, पियुष भोंगळे उपस्थित होते.