डॉ.आंबेडकर महाविद्यालयात दोन दिवसीय कोविड लसीकरण अभियान संपन्न

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7 जानेवारी):-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांच्या,विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेत .कोरोना विषाणूला कायमचे हद्दपार करण्यासाठी मोफत लसीकरण मोहीम हाती घेतली. त्याचाच भाग म्हणून स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे ग्रामीण रुग्णालय च्या वतीने दिनांक 6.1.2022 ते 7.1.2022 या दरम्यान 15 ते 18 वर्ष वयोगटातील महाविद्यालतीन विद्यार्थ्यांसाठी कोविड १९ लसीकरण अभियान राबविण्यात आले.

यात महाविद्यालयाच्या 626 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे,संस्थेच्या सदस्या , प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे, पर्यवेक्षक , प्रा .एस. व्ही. रामटेके, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य विभाग कर्मचारी तसेच सर्व प्राध्यापक वृंद , विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.