आष्टी तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.डाॕ.विनोद ढोबळे तर उपाध्यक्षपदी प्रविण पोकळे,शरद रेडेकर यांची निवड

30

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.7,जानेवारी):-तालुका पञकार संघाची नुकतीच बैठक जेष्ठ पञकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.यावेळी सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी विनोद ढोबळे यांची तर सचिवपदी गणेश दळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.आष्टी तालुका पञकार संघाची आष्टी येथे दर्पणदिनानिमित्त आज दि.७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता संपन्न झाली.या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.ही बैठक जेष्ठ पञकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे ,उत्तम बोडखे,रघूनाथ कर्डिले,भीमराव गुरव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

या बैठकीत सर्वानुमते पञकार संघाच्या अध्यक्षपदी विनोद ढोबळे,उपाध्यक्षपदी प्रविण पोकळे,शरद रेडेकर,सचिन रानडे,सचिवपदी गणेश दळवी यांची निवड करण्यात आली.या बैठकीस शरद तळेकर,संतोष सानप,सचिन रानडे,मनोज पोकळे,राजेश राऊत,शरद गर्जे यांच्यासह आदि पञकार उपस्थित होते.