ब्रम्हपुरी आय.टी.आय. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतिल प्राचार्यांचा मनमानी कारभार

31

🔹कंत्राटी कर्मचाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती(कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले)

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी (दि.8 जानेवारी):–शिक्षणाचे माहेरघर म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेल्या ब्रम्हपुरी शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी. आय.) मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांवर घोर अन्याय दिसून आला. सन २०१९-२० मध्ये ह्या प्रशिक्षण संस्थेतील ब्रम्हपुरीतील रहिवासी असलेले दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या योग्यतेवर लेखी, डेमो क्लास आणि प्रात्याक्षिक तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. पण २०२१ मध्ये नवीन आलेल्या प्रभारी प्राचार्यांनी ह्या दोघांना कोणतीही पूर्व सूचना न देता, यांना कामावरून काढून टाकले. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्या प्रभारी प्राचार्य.श्री. राजेश डांगे सर यांना सविस्तर जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा त्यांनी अरेतुरेची आणि शिवीगाळ भाषेचा वापर करीत, त्यांना डिसेंबर २०२१ मध्ये हाकलून लावले.

आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या अयोग्य व त्यांच्या ओळखीच्याच काही व्यक्तींना पैसे घेऊन त्यांना कंत्राटी तत्वावर नौकरीत घेतले. हा सर्व प्रकार त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावरील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असता, त्यांच्या कडूनही योग्य ते उत्तर यांना मिळाला नाही. ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आला, त्यांचा संपूर्ण जीवन ह्या नौकरीवर चालत होता, आणि आज त्यांच्यावर काही महिन्यांपासून आता उपासमारीची वेळ आली आहे. ह्या सर्व गोष्टीचा त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आले. अचानक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून पूर्व सूचना न देता काढून टाकणे, हे कितपत योग्य. अस प्रश्न सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. आणि ब्रम्हपुरी सारख्या शहरातील एका शासकीय प्रशिक्षण संस्थेत फक्त काही दिवसांसाठी प्राचार्य म्हणून आलेल्या प्रभारी व्यक्तीने ही गोष्ट घडवून आणली, ही खूप लाजिरवाणी गोष्ट दिसून आली. यावरून दिसून येते की, त्या प्रभारी प्राचार्याला उच्चस्तरावरून सपोर्ट आहे, आणि स्वतःच्या वयक्तिक फायद्यासाठी तो असा करत असेल, हे दिसून येत आहे. ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल रीतसर चौकशी व्हावी, आणि त्यांना न्याय मिळावा, हेच मागणी कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत कु. दिव्यांनी आनंदराव मेश्राम, पिंकेश्वर बावनथडे,राकेश कामडी, सुरज वेलथरे ,उदय पगाडे, यांनी दिली.