नेहरू युवा केंद्राच्या वतीने संत जनाबाई महाविद्यालयात विविध क्रिडा स्पर्धा संपन्न

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8जानेवारी):-नेहरु युवा विकास व क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र परभणी च्या वतीने दिनांक 7 जानेवारी रोजी संत जनाबाई महाविद्यालयाच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक नगर परिषद गंगाखेड ॲड. शेख कलीम,उप.प्रा.डॉ.दयानंद उजळंबे,डॉ संजीव क्षिरसागर, तुषार भैय्या गोळेगावकर,प्रा.डॉ. डोंगे ,प्रा.डॉ.प्रकाश सुर्वे,प्रा. गणेश सातपुते ,प्रा.बेरळीकर,प्रा.डॉ. अनिल शिनगारे ,डॉ.सचिन खोकले,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

ही स्पर्धा उपप्राचार्य तथा क्रीडा संचालक प्रा.डॉ. चंद्रकांत सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. स्पर्धेत विजयी ठरलेल्या संघाची निवड जिल्हास्तरावर होणार असून तालुक्यातून प्रथम द्वितीय येणाऱ्या संघाला प्राधान्य देण्यात येणार आहे. गोळा फेक, 100 मीटर धावणे ,400 मीटर धावणे ,कबड्डी, हॉलीबॉल या स्पर्धा घेण्यात आल्या.

कबड्डीचे प्रथम पारितोषिक संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड, द्वितीय बालाजी विद्यालय इसाद, हॉलीबॉल प्रथम संघ संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड ,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ गंगाखेड यांनी विजय संपादन केले.विजय संघाला जिल्हा युवक विकास अधिकारी शशांक राहुला, प्रा.भेंडेकर ,प्रा. उद्धव आघाव, प्रा.दूधभाते, प्रा सय्यद ,कवी विठ्ठल सातपुते आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेला पंच म्हणून प्रा. डॉ. लहू फड ,गुणवंत कांबळे ,प्रभाकर माळवे ,प्रतिक्षा वझे, सचिन राठोड ,अतिश खंदारे, बोटेवार, यांनी पंच म्हणुन भुमिका बजावली या नेहरू युवा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.