भिम टायगर सेनेच्या मौजे जामनाईक १ येथे शाखा उद्घघाटन सोहळा संपन्न

56

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12जानेवारी):-तालुक्यातील मौजे जामनाईक क्र १ येथे भिम टायगर सेनेच्या शाखेचा उद्घाघाटन सोहळा भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्या हस्ते रिबीन कापून संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर खंदारे, गीताताई कांबळे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, जिल्हा सल्लागार प्रा. महेश हंबर्डे, जिल्हा सचिव अण्णा दोडके ,तालुका कार्याध्यक्ष विजय निखाते, तालुका उपाध्यक्ष गौतम खडसे, काकडदाती शाखाप्रमुख नारायण दोडके ,ॲड किसन कोठुळे ,काटखेडा शाखाप्रमुख दिपक गायकवाड, प्रा. छायाताई हंबर्डे ,राहुल झिंजारे ,वैभव वाघमारे ,अमोल जहागीर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रमाई महिला मंडळाने पंचशील त्रिशरण घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रथम जामनाईक क्र.१ येथील लहान मुलींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतावर नुत्य सादर केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक महेश हंबर्डे यांनी केले. सूत्रसंचालन भीमराव आठवले यांनी केले.

या कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष सुभाष आठवले ,उपाध्यक्ष सिद्धार्थ इंगोले, सचिव अमोल कांबळे, कार्याध्यक्ष मधुकर ढोले, अशोक काशिंदे, संजय कांबळे ,संभाजी आठवले ,रामजी ढोले ज्ञानबा आठवले रामजी ढोले ,भगवान ढोले ,उत्तम आठवले चंद्रमुनी आठवले मारुती गंगाळे ,जनार्दन आठवले, परसराम इंगोले, पंचशील महिला मंडळ, रमाई महिला मंडळ जाम नाईक क्र १ व गावातील नागरिक उपस्थित होते.