एसटी बंदचा परिणाम; जीपच्या टपावर बसून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

31

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.12जानेवारी):-ग्रामीण भागात एसटीची वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. एसटी बंदमुळे ग्रामीण भागातील नागरिक खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करत आहेत.

माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना अक्षरशः जीपच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करावा लागतोय.
संपामुळे एसटी अद्याप ग्रामीण भागात पोहचलीच नाही. परिणामी खासगी वाहतुकीतून असा थरारक प्रवास करावा लागतोय.