महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे ‘ राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ‘ व ‘ युगपुरुष स्वामी विवेकानंद ‘ जयंती उत्साहात साजरी…

30

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि. १२जानेवारी):- २०२२ बुधवार रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे ” राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब ” व ” युगपुरुष स्वामी विवेकानंद ” यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी.आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे.एस. पवार, ज्येष्ठ शिक्षिका एम. के.कापडणे यांच्या हस्ते राष्ट्रमाता – राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.हेमंत माळी यांनी जिजाऊंचे बालपण व बालपणापासून त्यांना मिळालेली शिकवण – युद्धनीती , राजनीती , बहुभाषांचे ज्ञान… व माँसाहेबांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकच नाव दिले ते म्हणजे मावळा.

यानंतर सतीप्रथा, अंधश्रद्धा , कर्मकांड, दैववाद आदी गोष्टींना कडाडून आणि कृतीतून विरोध केला… आणि स्वराज्याचे एक नव्हे तर दोन छत्रपती घडवणारी राजमाता म्हणजेच माँसाहेब जिजाऊ. असे प्रतिपादन केले.याप्रसंगी सी.एम. भोळे, एस.व्ही.आढावे, एम.बी.मोरे, एस.एन.कोळी, पी.डी.पाटील, व्ही.टी.माळी, श्रीमती व्ही.पी.वऱ्हाडे, एम.जे.महाजन, लिपीक पी.डी. बडगुजर,अशोक पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.