राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

23

✒️माधव शिंदे(नांदेड जिल्हा,प्रतिनिधी)

नांदेड(दि.13जानेवारी):-जवाहरलाल नेहरू मा.व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कु.राजनंदनी पवार या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनावर आधारित समयोचीत विचार व्यक्त करतांना बालपन त्यांचे कर्तत्व नेतृत्व आणि दात्रत्व हे गुण जीवनाचा आकार देऊन दोन दोन छत्रपती घडवले !!

एकूलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भालाफेक !! हे गीत सादर केले त्यातूनच आज आम्ही घडलो महाराष्ट्र घडविला अशा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आज आम्ही एक कणखर खंबीर आणि प्रभावी होऊन समाज घडविण्याचे काम करत राहण्याचा संकल्प केला.यावेळी प्रा सुदर्शन धर्माधिकारी, प्रा.शिंदे सर श्री. फड सर प्रा.तगडलेवार प्रा.शिवाजी हंबर्डै श्री तिप्पलवाड सर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.