खडकदरी येथे भिम टायगर सेनेच्या शाखा फलकाचे उद्घघाटन सोहळा थाटात संपन्न

36

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.19जानेवारी):-तालुक्यातील मौजे खडकदरी येथे भिम टायगर सेनेच्या शाखा फलकाचे उद्घाघाटन सोहळा भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्या हस्ते रिबीन कापून संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भीम टायगर सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई कांबळे, जिल्हा सल्लागार प्रा. महेश हंबर्डे, जिल्हा सचिव अण्णा दोडके , तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे,तालुका कार्याध्यक्ष विजय निखाते, शहराध्यक्ष प्रीतम आळणे, तालुका उपाध्यक्ष गौतम खडसे, राहुल झिंजारे,काटखेडा शाखाप्रमुख दिपक गायकवाड, प्रा. छायाताई हंबर्डे , सीमा आसोले हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रमाई महिला मंडळाने पंचशील त्रिशरण घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खडकदरीचे सरपंच सिद्धार्थ कांबळे यांनी केले.गीताताई कांबळे यांनी आपले विचार मांडले तसेच प्राध्यापक महेश हंबर्डे यांनी सुद्धा आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी भिम टायगर सेना याचे कार्य समजावून सांगितले.

या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सिद्धार्थ कांबळे, पोलीस पाटील दिगंबर चिमडे, शेख इसाक शे नदीम तंटामुक्ती अध्यक्ष शाळा समिती अध्यक्ष कैलास अवचारे उपसरपंच गोपीनाथ बमरुळे पुंडलिक इंगळे ग्रामपंचायत सदस्य शाखा अध्यक्ष राजरतन कांबळे, अमोल आवटे, गणेश खडसे ,किरण कांबळे, सिद्धार्थ आवटे ,विशाल कांबळे, सुनील आवटे, अविनाश खंदारे ,रवी हारणे, सत्यशिल कांबळे ,भारत कांबळे, सविधान कांबळे, देवानंद धुळे ,आकाश भालेराव, गजानन आवटे ,आकाश कांबळे ,गजानन खडसे तसेच गावातील महिला मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश खंदारे यांनी केले तर आभार विशाल कांबळे यांनी केले.