आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21जानेवारी):-मुख्यमंत्री ग्रामसडक योजना परभणी अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील १) प्रजिमा२० ते शंकरवाडी-दत्तवाडी रोड ता.गंगाखेड किमी ०/०० ते ०२० रस्त्याची सुधारणा करणे या कामाकरिता १०५.३० लक्ष रुपये २) रामा २४८ ते धारासूर रोड ता.गंगाखेड किमी ५/०० ते ७/०० रस्त्याची सुधारणा करणे या करिता १४३.८४ लक्ष रुपये या रस्त्याच्या कामाची सुधारणा करण्याचा भूमिपूजन सोहळा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते आज दि.२१ जानेवारी रोजी संपन्न झाला.मोजे शंकरवाडी,दत्तवाडी व धारासूर येथील नागरिकांची रस्ता अभावी गेल्या अनेक दिवसांपासून हेळसांड होत होती.या रस्त्याच्या कामाची सुधारणा करण्याची कामे बर्‍याच वर्षापासून प्रलंबित होती.

आमदार गुट्टे यांच्या सततच्या प्रयत्नाने या दोन्ही रस्त्याच्या सुधारणा कामे मंजूर झाली त्यामुळे या परिसरातील सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.या प्रसंगी जि.प. सदस्य किशनराव भोसले,राजेश फड, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, सरपंच तथा पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गवळी, राजेभाऊ बाप्पा कदम, बन्सी नाना जाधव,अनंतराव जाधव, बाळासाहेब जाधव, सर्जेराव जाधव, रामेश्वर जाधव, माजी पं.स.सदस्य बालासाहेब नेमाने, संदीप कदम, अच्युतराव जाधव, लखन कदम, सुभाष सोळंके, भागवत कदम, शेषाद्री मोरे, बबन साखरे,राठोड सर,सरपंच व उपसरपंच यांच्यासह मौजे धारासुर,शंकरवाडी,दत्तवाडी येथील नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED