राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद द्वारा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ व ‘प्रजासत्ताक दिना’ चे आयोजन

53

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.23जानेवारी):-राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्र द्वारा दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ व २६ जानेवारीला ‘भारतीय प्रजासत्ताक गणराज्य दिन’ महाराष्ट्रातील सहा विभागात तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात अभाषी पद्धतीने संपन्न केला जाणार असल्याचे राज्याध्यक्ष प्रा.सुमित पवार सर यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे..

मुंबई व कोकण विभाग प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, कोल्हापूर विभाग प्रा. गौतम डांगे, औरंगाबाद विभाग प्रा.शीतल भुतडा,
नाशिक विभाग उपप्राचार्य अनिल माळी, अमरावती विभाग प्रा.तानाजी भोसले तर नागपूर विभागात उपप्राचार्य. टी. के. सरगर सर या सर्व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात २५ जानेवारीला सायंकाळी ५ ते ७ या वेळात संपन्न होणार आहे.

हा कार्यक्रम प्रत्येक विभागीय पालक व महासचिवांनी आयोजित करून प्रत्येक विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान राज्याध्यक्ष प्रा सुमित पवार सर,सहसचिव प्रा सुनील राठोड सर कार्याध्यक्ष प्रा संजय सुतार, उपाध्यक्ष प्रा शरद जोगी, सुरेश नारायणे आणि नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी केले आहे.