सेवानिवृत्ती निमित्त सैनिक किशन सुर्यवंशी यांचा सत्कार समारंभ संपन्न

29

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड)मो:-9373868284

हदगाव(दि.5फेब्रुवारी):- तालुक्यातील कहोना गावचे भूमिपुत्र सैनिक किशन महाजन सूर्यवंशी भारतीय सैन्य दलातील बावीस वर्षांच्या सेवेनंतर ३१ जानेवारी २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेले सैनिक किशन महाजन सुर्यवंशी दि.४ फेब्रुवारी२०२२ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या जन्मगावी कवाना येथे भव्य सत्कार सोहळा श्री संत नंदी महाराज संस्थान, कवाना ता. हदगाव जि. नांदेड येथे संपन्न करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अँड. मुरलीधर ढाके हे होते .विशेष अतिथी म्हणून आ. माधवराव पाटील जवळगावकर उपस्थित होते.

तालुका हदगाव चे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार जिवराज डापकर, तालुका हदगाव चे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतापराव सुर्यवंशी, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलुरकर, पोलीस उपनिरिक्षक मनाठा येथील पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण, साहित्यिक जगदिश कदम, प्रा. श्रीनिवास मस्के, ग्रंथालय संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कुबेर धनसिंह राठोड, तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

सेवापूर्ती कार्यक्रम हदगावतहसील चे तहसीलदार जीवराज डापकर व हदगाव चे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी सैनिक किशनराव महाजन सूर्यवंशी यांचा येथेच सन्मान करून त्यांना एक पेन भेट त्यानंतर हदगाव हिमायतनगर चे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या देशसेवेच्या व देशभक्तीच्या जीवनावर उजाळा दिला. देशसेवा करून संबंध भारत देशामध्ये जम्मू काश्मीर, लदाख, छत्तीसगढ, त्रीपुरा ,श्रीनगर ,आसाम अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपली कामगिरी बजावली. पुढे बोलताना ते म्हणाले की आमच्यासाठी जात,धर्म नसतो हे मंदिर नाही मज्जित नाही सर्वधर्मसमभाव असतो.

माझ्याही जीवनात असे काही खूप तसं झाले ते मी तुम्हाला सांगू शकत नाही मी माझी देशसेवा प्रामाणिकपणे केली. या कार्यक्रमाचे आयोजन कवाना गावचे उपसरपंच संदीप पवार यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी सादुलवार यांनी केले सामाजिक कार्यकर्ते दिपक सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील ,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,साहित्यिक, कवी ,ज्येष्ठ विचारवंत , पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मामिडवार, जिल्हा सरचिटणीस संदीप तुपकरी सहसचिव तुषार कांबळे दैनिक देशोन्नतीचे इस्माईल पिंजारी,गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित व शेकडो कार्यकर्ते माता-भगिनी उपस्थित होत्या.