देश-विदेशातील भिक्षुंसह २५ हजार धम्मबांधव ऑनलाईन पद्धतीने घेणार लाभ

90

🔹अखिल भारतीय बोध्द धम्म परिषद १५ फेब्रुवारीपासून

✒️अमोल उत्तम जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)

मुळावा(दि.5फेब्रुवारी):-भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला सुख समाधान शांती व दुःख मुक्तीचा मानवतावादी धम्म या धम्माचे सर्वांना ज्ञान व्हावे या हेतूने मुळावा (तालुका उमरखेड) येथे १५ व १६ फेब्रुवारीला माग पौर्णिमेनिमित्त सतरावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात येणार आहे.या परिषदेला देश,विदेशातील अनेक बौद्ध भिक्षु उपस्थित राहणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने ही धम्मपरिषद धम्म अज्ञान व समृद्धी या चॅनेलवर सुरू राहील १५ फेब्रुवारीला सकाळी पाच वाजता ज्ञान साधने द्वारा या धम्मपरिषद सुरुवात होईल.

सकाळी आठ वाजता धम्म ध्वजारोहण शील ग्रहण त्रिरत्न वंदना परित्राण पाठ व धमसदेशना होईल .दुपारी दोन वाजता उपस्थित भिक्षू गणा मधील ज्येष्ठ भिक्षूंच्या हस्ते या धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी भिक्षू संघाद्वारे विविध विषयावर धम्मदेशना होईल .त्यावेळी परिसरात कुठल्याही प्रकारचे दुकाने हॉटेल्स पाणटपर्या लावण्यावर प्रतिबंध करण्यात आलेले आहे. या धम्म परिषदेमध्ये केवळ पुस्तकांची दुकाने राहतील ही दुकाने धम्मदेशना सुरू असताना बंद राहतील गायनाचा कुठलाही कार्यक्रम होणार नाही .सर्व बांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून परिषद परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक भारतीय बौद्ध ज्ञान आलंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो यांनी सांगितले आहे.