डोळे हे जुल्मी गडे….

57

अडीच अक्षराच्या घडनीतून आकारास आलेली अतिशय पवित्र भावना म्हनजे प्रेम.वयात येनार्या प्रत्येक तरुण-तरुणीच्या ओठांवर, “माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे वाक्य एकदा कधीनाकधी तरी आत्महत्या करुन जातं.म्हणुच एखाद प्रेमविर असंही म्हणताे, “खामोशी काे ईख्तीयार कर लेना,अपने दील काे बेकरार कर लेना,जिंदगी का असली दर्द लेना हाे ताे,कीसीसे बेपनाह प्यार कर लेना…”प्रेमाविषयी अनेक लाेक आपली मतं मांडतात, कुणी शायर म्हणताे,“प्रेम अगर एक तरफ हाे ताे सजा देता है. प्रेम अगर दाे तरफ हाे ताे मजा देता है”कुणी म्हणताे. “प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं” मला विचाराल तर प्रेम म्हणजे प्रेम असतं. पण तुमचं आमचं सेम नसतं. त्यामुळे कुणी यशस्वी हाेताे तर कुणाचं फसतं.पण दाेस्तांनाे खरच प्रेम म्हणजे प्रेम असतं .

प्रत्येक आईवडील मुलांसाठी ताजमहाल उभारु पहातात.पण मुलांचा आनंद झाेपडीत असेल तर तुमचा ताजमहाल कुचकामी ठरताे.सूख,समाधान आणि आनंद ह्या कल्पना माणसागणीक बदलत जातात. तुम्ही आईबाबा तुमच्या कल्पनेतील सुखाचा शाेध घेताय . मुलांचा आनंद ते वेगळीकडे शाेधतात. सुख,समाधान,आनंद ह्या भावनिक कल्पना आहेत. त्या शेर पाव अशा मापाने नाही माेजता येत. आपण प्रेमात जात धर्म आनताे आणि लग्नाला विराेध करताे.पण आपल्या विक्रुत मनाला बलात्कारासाठी,वेश्यागमनासाठी कूठल्याही जात धर्माची. बाई चालते. आपण स्वतःच्या साेय़ीचं स्विकारताे. गैरसाेयीचं असेल राेष काढताे. हा मानवी स्वभाव आहे.एका सभेत कनयाकुमार रामदेव बाबाला म्हनताे, “हमारे पास साेच है ताे हम साेचेंगे आपके कहेनेसे दंतकांती मंजन क्यू ईस्तमाल करेंगे??” तात्पर्य एवढंच, आपला मेंदू कूनाच्या संकेतानं चालू नये. आपण लाेक काय म्हनतील असा विचार करताे. आणि केवल जात धर्म अशा निरर्थक कल्पनांना गाेंजारत बसताे. आपल्या अहंकारापुढे आपल्या मुलामुलींचं प्रेम, त्यातील त्यांचा आनंद आपल्याला दीसत नाही. आपन त्यांच्यासाठी ताजमहाल उभारतेा. मुलं त्यांचा आनंद झाेपडीत शाेधतात.कधी आपला विराेध विकाेपाला गेला तर ते जीवाचं बरं वाईट करतात. आपण त्यांच्या अशा वेदनादायक अस्तासाठी जन्माला घालताे??

सैराट हा चित्रपट कितीही पुरस्कार घेणारा ठरला तरी अजुनही त्याची समिक्षा सुरुच आहे. चित्रपटाचा शेवट अनेकांना आवडला नाही. त्यांच्या मते त्यांनी पळुन जाऊन लग्न करण्यापेक्षा परशाने डाँक्टर ईंजिनिअर बनायला हवं तसेच तिनेही शिक्षण घ्यावं.आणि मग परशाने आर्चीच्या वडीलांना मागणी घालावी व आर्चीच्या वडीलांनी त्या लग्नास हाेकार द्यावा,असा शेवट असावा,असायला हवा हाेता असं मत काही वैचारिक लाेकांनी व्यक्त केलं. ही त्यांची कल्पकता आहे.मंजुळेंनी कल्पनेला जाेड देउन देशाच्या वास्तवादी नालायकपणावर बाेट ठेवला. नागराज मंजुळेंसाठी हा कुण्या शायराचा शेर ….

शायर हु मै,फर्ज मेरा आयना दीखाना,मै लाशाेपर गझल कर नही सकता,ईस जुल्म की जाे सजा दाे मुझे लेकीन मै जुल्मपर कभी खामाेश रह नही सकता.!! मंजुळेंनी प्रेम ही भावना आजही जात धर्मवादात कशी अडकुन पडली हे कलात्मक मांडणी करुन पुराेगामीत्वाचे साेंग घेणार्यांच्या नजरेस आणून दीलं. प्रेमावरील एक वास्तववादी सुंदर कलाक्रुती निर्माण केली. प्रेम श्रीमंतांचं असाे किंवा गरिबांचं,प्रेम प्रेम असतं. ते धर्मवादाच्या जतीवादाच्या चाैकटीत अडकवता येत नाही. कारण.”माेहब्बत ना हाेती ताे गझल काैण लिखता,कीचडमे खिले फुल काे कमल काैण कहता,प्यार ताे खुदा का करिश्मा है,वरणा लाश के घर काे ताजमहल काैण कहता.” जात धर्माचं काही नसतंहाे ! टीचभर छातीतील भावनिक कल्लाेळांचा हातभर पसारा म्हणजे प्रेम असतं. आणि प्रेमात पडणार्यांची सारखी स्थिती असते ती अशी..”तनहाईमे मुस्कुराना ईश्क है,एक बात काे सबसे छुपाना ईश्क है,यु ताे निंद नही आती हमे रातभर,मगर कीसीकी याद मे साेते साेते जाग जाना ईश्क है”शेक्सपिअर म्हनताे, “प्रेम दीशादर्शक तारा आहे. दिवसात आठवड्यात ते कधी बदलत नाही. भटकलेल्यांना ते वाट दाखवतं.”

लाँर्ड बायराँन म्हनताे, “सर्व काही प्रेमासाठी ” मरनसन्न झालेला जाँन कीट त्याच्या प्रेयसिला अखेरच्या टप्प्यात लिही ग एक पत्र लिही अशी आर्त विनंती करताे. हे प्रेमाचं सामर्थ्य आहें. म्हणून तर हीर-रांझा, वासू-सपना, नल-दमयंती ……ईत्यादी प्रेमकथांचा ईतिहास कितीही शिळा असला तरी आजही ताजा आणि टवटवित वाटताे. म्हणून लाँर्ड बायराँन म्हणताे, ए प्रसिद्धी( ओ फेम) मी तुझ्या मागे कधी लागलाेच असेन तर ते फक्त माझ्या प्रियतमेच्या डोळ्यांत सुंदर भाव दिसावेत म्हणून. कधी तुझा शाेध घेतला असेल तर ताेही प्रियतमेच्या डाेळ्यांतच आणि तू मला भेटलीस ते ही प्रियतमेच्या डाेळ्यातच. आल फाँर लव्ह म्हणनारा बायराँन सारं जग प्रेयसिच्या डाेळ्यात बघताे.कारण प्रेमाची भाषा डाेळेच डाेळेच बाेलत असतात. म्हणून तर म्हणतात डाेळे हे जुल्मी गडे! कारण बाेलता बाेलता ते प्रेमात पडतात.डाेळे टपाेरे,डाेळे पाणीदार,डाेळे बाेलके,डाेळे म्रुगनयनी,डाेळे वहातात,डाेळे पाहतात.ते जुलुम करतात प्रेमात पडण्याचा.म्हणून तर म्हणताे, “प्रेम करावे कुणीही प्रेम करावे कुनावरही, प्रेम करावे त्याने तिच्या, तिने त्याच्या गुनांवरही प्रेम करावे कुनीही प्रेम करावे कुनावरही ”
प्रेमदिनाच्या आभाळभर शुभेच्छा!

✒️लेखक:-राजू बाेरकर(७५०७०२५४६७)लाखांदूर,जि.भंडारा