खैरगाव येथे स्वच्छता जागरुकता आणि श्रमदान कार्यक्रम

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15फेब्रुवारी):-नेहरु युवा केंद्र चंद्रपूर युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत व युथ स्ट्रगल ग्रूप यांच्या सहकार्याने चंद्रपूर तालुक्यातील खैरगाव येथे स्वच्छता जागरुकता आणि श्रमदान कार्यक्रम गावामध्ये राबविण्यात आला. व श्रमदानाच्या माध्यमातुन गावामधील रस्ते, नाल्या, चौक, गावातील पूर्ण परिसराची साफ- सफाई करण्यात आली. व स्वच्छतेचे महत्व व त्यापासून होणारे रोगराई पासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. व गावामधे स्वच्छतेचे धडे देण्यात आले.

कार्यक्रमात खैरगाव गावतील सरपंच माधुरी सागोरे , तंटामुक्ती अध्यक्ष अरुण दैयवरकर, पोलीस पाटील शंकर ताजने, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, ग्रामपंचायत सदस्य अंकित ढेंगारे, माजी उपसरपंच अर्जून नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विजोडा संगीता हेलवडे तसेच युथ स्ट्रगल ग्रूप चे अध्यक्ष प्रतिक मसराम, कुणाल क्षिरसागर , सूरज पारशिवे, उमेश मसराम, साहील पारशिवे, नयन धूर्वे, सुमित पारशिवे , आयुष रायपुरे, उज्वला नेवारे, प्रणाली धांडे तसेच गावातील मंडळी यांचे मोलाचे योगदान या आयोजित कार्यक्रम निमित्त मिळाले. हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र तालुका प्रतिनिधी चंद्रपूर प्रगती मार्कडवार यांच्या अंतर्गत पार पडला.