बौद्ध धम्मातील कर्म सिद्धांत सुखी जिवन जगण्याचा मार्ग – भदन्त इंदवंश (कुशीनगर)

32

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.15फेब्रुवारी):- भौतीक सुखाच्या वणव्यामध्ये होरपळणाऱ्या समस्त विश्वातील नागरीकांनी बौद्ध धम्मातील कर्म सिद्धांतानुसार आचरण हेच सुखी जिवनाचा सम्यक मार्ग असल्याचे प्रतिपादन कुशीनगर, बिहार राज्यातून आलेले भदन्त इंदवश यांनी केले. ते मुळावा येथे आयोजीत अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद येथे धम्म देशना देतांना बोलत होते.

सकाळी 5 वाजता ध्यान साधना बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदनाने या परिषदेची सुरवात झाली. त्या नंतर भदन्त करुणानंद यांनी धम्मध्वजारोहण केले.

यावेळी धम्म परिषदेचे आयोजक भदन्त धम्मसेवक महाथेरो, भदन्त खेमधम्मो महाथेरो व भिक्षू संघ उपस्थीत होते.

दुपारी धम्म परिषदेची सुरवात झाली. भदन्त करुणानंद औरंगाबाद यांनी, बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत व धम्म या विषयावर तर प्रा डॉ. सत्यपाल महाथेरो यांनी चार आर्य सत्य व आर्य आष्टागींक मार्ग तून धम्म संस्कार या विषयावर सविस्तर धम्मदेशना दिली.

भदन्त हर्षबोधी थेरा यांनी, बोधीसत्व होण्याचा मार्ग तर भदन्त प्रेमानंद यांनी , बौद्ध धम्मच हा सद्धम्म आहे या विषयावर धम्म देशना दिली.यावेळी भदन्त धम्म बोधी थेरो, एन. धम्मानंद, भदन्त नागसेन , भदन्त श्रद्धानंद, सह भिक्षू संघ , श्रामणेर संघ उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भदन्त दयानंद महाथेरो यांनी केले.17 धम्म परिषदेचे उदघाटन दुपारच्या भिक्षू संघाच्या धम्म देशेनेने संपन्न झाले.