घुग्घुस पोलीस स्टेशन ७० नग दुचाकी वाहन लिलाव

30

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔹१५ फेब्रुवारी रोजी १० ते २ लिलाव करण्यातआले

पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या उपस्थितीत हा लिलाव करण्यात आला.

घुग्घुस(दि.15फेब्रुवारी):-येथील पोलीस ठाण्यात बऱ्याच कालावधी पासुन दुचाकी वाहने जमा होते व आज १५ फेब्रुवारी ७०नग दुचाकी वाहन लिलाव झाले,एकूण ८३ लोकांनी लिलावात सहभाग घेतले व त्यांना नंबर (टोकन)कुपन देण्यात आले,सरकारी बोली १लाख ५हजार २००रू.होती.

लिलावात बोली क्र.नंबर ५९ करीम लाला लिलावात बोली ३ लाख ५५हजार, ३लाख ६५हजार व ४ लाख ५हजार,बोली क्र. ७१ नंबर रिजवन रमजान शेख लिलावात बोली ३लाख ६०हजार,बोली क्र .३३ शेख रहीम मोहम्मद इजाज ३लाख ६७हजार,४लाख १हजार व ४लाख १० हजार,बोली क्र .७३ फारूख ईसाद शेख लिलावात बोली ४लाख ११हजार,बोली क्र. १९ एजाज खान लिलावात बोली ४लाख १२ हजार,बोली क्र. १ सैय्यद फैजुल अजीम लिलावात बोली ४लाख १५ हजार झाली.

लिलाव पोलिस स्टेशन घुग्घुस उपस्थित स.पो.नि.एस.यु.सिंह,स.पो.नि.ए.एस.टोपले,पोलिस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे,मुद्देमाल मोहरर पो.हवा.इंद्रपाल गोंगले, पो.हवा.विनोद लोंखडे, गजानन झाडे व पोलिस स्टेशन घुग्घुस येथील डि.बी.व ईतर पोलिस कर्मचारी यांनी लिलाव बंदोबस्त उत्तमरित्या शांततेत पाडला.