दुसलगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरंपच यांना निलबन करण्यासाठी उपोषणास ग्रामपंचायतचे सदस्य बसणार

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15फेब्रुवारी):- तालुक्यातील दुसलगाव ग्रामपंचायतचेग्रामसेवक आणि सरपंच यांच्या विरोदात दिनांक 27सप्टेंबर 2021रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद परभणी, तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती कि मोजे दुसलगाव तालुका गंगाखेड येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी ग्रामपंचायत ची एकही मिंटींग न घेतल्या मुळे तसेच त्यांनी केलेल्या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी.

आ्सी तक्रार करण्यात आली होती परंतु याबाबत कुठलेही चौकशी झाली नसल्याने आम्ही ग्रामपंचायतचे सदस्य दिनांक 17फेब्रुवारी 22रोजी गंगाखेड तहसील कार्यालय समोर उपोषण
बसणार असल्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर ग्रामपंचायतचे सदस्य भुजंग उत्तम पारवे,सरिता सुनील सोळंके,गणेश श्रीनिवास कचरे यांच्या स्वाक्षरी आहेत.