जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स गडचिरोली महिला जिल्हा्ध्यक्षपदी शर्मिला जनबंधु यांची निवड

74

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.16फेब्रुवारी):-जिल्ह्यातील माडेतूकुम येथील रहिवासी असलेल्या आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या , सामाजिक कार्यकर्त्या व अभिनय , गायन, वाचन, पर्यटन यांचा छंद जोपासणाऱ्या शर्मिला सावळेराम जनबंधू यांची जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स च्या गडचिरोली महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर निवड जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांच्या शिफारशी नुसार जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स चे विदर्भ अध्यक्ष संजीव भांबोरे व विदर्भ महिला आघाडीच्या अध्यक्ष उषा घोडेस्वार यांनी ही नियुक्ती जीवन आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ .शंकर पोवार व प्रतिभाताई पोवार यांनी ही केलेली आहे .जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स ही संस्था महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून एनजीओ संस्था आहे. या संस्थेला स्कॉटलंड मार्फत आय .एस. ओ .मानांकन ने सन्मानित केले आहे .या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर ,सांगली ,बेळगाव ,येथे संघटनेच्या माध्यमातून 600 रेस्क्यू फोर्स ची टीम उभी असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे .

शर्मिला सावळेराम जनबंधू यांची निवड झाल्यामुळे नक्कीच जिल्ह्यातील सर्व समाजातील तळागाळापर्यंत पोहचुन लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील . त्यांनी आरोग्य विभागात काम करीत असतांना विविध संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. शर्मिला जनबंधू ह्या मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात आरोग्य विभागात, आदिवासी नक्षलग्रस्त, भागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करित आहेत.त्यांनी आरोग्य विभागात कार्यरत असतांना महिलांचे अनेकविध प्रश्न मार्गी लावले आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक महिला संघटनांमधे विविध महत्त्वाचे पदावर कार्य केले आहेत.

शर्मिला जनबंधु यांनी आरोग्य सेवेत आरोग्य सेविका म्हणून काम करीत असताना काविळ, अतिसार, हगवण , जलजन्य आजार , हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, मेंदूज्वर , किटकजन्य आजार, मधूमेह , कॅन्सर, आदी असंसर्ग आजारी रुग्णांचा शोध घेतला. प्रत्येक घरी भेटी देऊन कुटुंब प्रमुखांना आस्थेने विचारून विविध प्रकारच्या आजारांचा शोध घेण्याची उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आजही ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा दूत मानले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या लक्षात घेतली तर आरोग्य सेविका यांनी केलेले महत्त्वाचे कार्य अधोरेखित होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना आणि वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आरोग्य सेवेत मागिल अनेक वर्षांपासून कंत्राटी पध्दतीने अल्पशा मानधनावर काम आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्यात यावे. समान काम… समान वेतन देण्यात यावे. प्रलंबित वेतनवाढ शासनाने तात्काळ द्यावी.
कोविड – 19 मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. एन. एच. एम नवीन पदभरती करताना सेवाजेष्टतेचा विचार करून पदे भरण्यात यावीत, यासारख्या अनेक मागण्या शासन यंत्रणेकडे रेटून धरल्या आहेत .

इतकेच नव्हे तर शर्मिला जनबंधु यांनी आपल्या आरोग्य सेवेच्या कालावधीत कुटुंब कल्याण कार्यक्रम, राष्ट्रीय हिवताप व हत्तीरोग निर्मुलन , कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम , राष्ट्रीय क्षयरोग उपचार व निर्मुलन कार्यक्रम , शालेय आरोग्य ., कोविड लसीकरण कार्यक्रम , तसेच आदिवासी क्षेत्र, नक्षलग्रस्त क्षेत्र, तसेच शासनाच्या विविध आरोग्य विषयक कृती आराखडा कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाले. राष्ट्रीय अंधत्व कार्यक्रम , नियमित लसीकरण कार्यक्रम , पोलीओ निर्मुलन कार्यक्रम , जननी.. शिशू सुरक्षा कार्यक्रम यासारख्या अनेक उपक्रमात सहभागी होऊन जनहिताच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य करीत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल हजारो चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील विविध प्रकारच्या विकासात्मक कार्यांसाठी शुभेच्छा दिल्या.