मोहबोडी येथील मामा तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन

32

🔹मोहबोडी येथील मजुरांना हाताला मिळाला रोजगार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

सिंदेवाही(दि.16फेब्रुवारी):- सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कुकडहेटी गट ग्रामपंचायत मधील मोहबोडी येथील मामा तलाव गट नं. ६६४ (गावबोडी) तलावाचे खोलीकरण कामाचे भूमिपूजन दि. १५ फेब्रुवारी ला सरपंच रामचंद्र चौधरी, उपसरपंच उज्वला तोरणकर, गुलाब मेश्राम माजी उपसरपंच, सोरते पी.टी.ओ.सिंदेवाही, रोजगार सेवक देविदास चौधरी, यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात येऊन खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

कुकडहेटी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोहबोडी येथील शेतकरी मजूरवर्ग यांच्या हाताला काम नसल्याने आणि शेतीची कामे संपल्यामुळे रिकामे होते त्यांनी ग्रामपंचायत ला कामाची मागणी केली असता पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेतुन मामा तलावाच्या खोलीकरण कामाचे तात्काळ काम मंजूर होऊन कामाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात करण्यात आली.त्यामुळे मोहबोडी येथील मजूर वर्गात आनंदाची लहर निर्माण झाली आहे हाताला काम भेटल्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायती चे आभार मानले आहे.

या कामाच्या भूमिपूजनाला सरपंच रामचंद्र चौधरी, उपसरपंच उज्वला तोरणकर, गुलाब मेश्राम ग्रा. प. सदस्य, रोजगार सेवक गेविदास चौधरी, सोरते पी.टी.ओ. सिंदेवाही, भुजंगराव आत्राम तंटामुक्त अध्यक्ष, उज्वला तोरणकर, स्वाती जांभुळे ग्रा. प. सदस्य., रागिणीताई लेनगुरे, ग्रा. प. सदस्य., दिलीप मोहूर्ले, सुरेश मोहूर्ले, संजय मोहूर्ले, योगराज आत्राम, गणपत मोहूर्ले, सुनील गुरणुले आणि सर्व कामावर उपस्थित मजूर वर्ग उपस्थित होते.