गडचांदूर येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा संपन्न !

31

🔹संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्य त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात !

✒️शुद्धोधन बनसोडे(तालुका,प्रतिनिधी जिवती)मो:-7569482081

जिवती(दि.16फेब्रुवारी):-वंचित बहुजन आघाडी ता. कोरपना चे वतीने कोटा कॉम्प्लेक्स गडचांदूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुशलभाऊ मेश्राम विशेष समन्वयक राज्य कार्यकारणी यांनी भूषविले व त्यांनी मार्गदर्शनात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचे कार्यकर्त्यांनी पालन करावे असे आव्हान केले.भूषण फुसे साहेब चंद्रपूर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी ओबीसी समाज खूप मोठा समुदाय आहे मात्र त्यांना सत्तेपासून वंचित ठेवले जात आहे . त्यांचे आरक्षण संपविण्याचे काम चालू आहे त्यामुळे त्यांना सोबत जोडून घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे .
तसेच इतर वंचित घटकांना पक्षासी जोडले पाहिजे असे मत व्यक्त केले .

धीरजभाऊ बांबोडे महासचिव वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर यांनी येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांना कसे सामोरे जावे त्यासाठी कशी तयारी करावी लागेल याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.अमोल राऊत प्रसिद्धीप्रमुख वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते .
मधुकर चूनारकर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ता. कोरपना यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचालन प्रा. डॉ. सोमाजी गोंडाने उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी केले.
कार्यक्रमाला साजिद शेख, दिव्यकुमार बोरकय ,आणि तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्य त्यांना वंदन करूनच कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .

या कार्यकर्ता मेळाव्यात अनेकांनी पक्ष प्रवेश केलात्यात रवी भाऊ आदे, बुधभुषण जीवने लोणी,धम्माभाऊ कापसे, सोनुर्ली प्रशिक गणवीर, गडचांदूर आणि शबाना मुसा शेख अश्या अनेकांनी पक्ष प्रवेश घेतला.येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात विचार करून त्या कश्या जिंकता येतील यावर चर्चा करण्यात आली .व येणाऱ्या निवडणूका वंचित ताकतीने लढेल व जिंकण्यासाठीच लढेल असा निश्चय करण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विजय जीवने, विकी खाडे ,साजिद शेख ,राजेंद्र नळे, किशोरभाऊ निमगडे ,राहुल निरांजने, आदींनी परिश्रम घेतले मेळाव्यात तालुक्यातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.