युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

31

🔹पवनी तालुक्यातील मुळचा सिंधी गावातील आरोपी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17फेब्रुवारी):- पवनी तालुक्यातील मुळच्या सिंधी गावातील खाजगी नोकरीच्या निमित्ताने येथील गांधी नगरात किरायाने राहणाऱ्या अविवाहित युवतीवर वारंवार माझ्याशी लग्न कर म्हणून बळजबरी करून विनयभंग करणाऱ्या आरोपी नामे स्वप्नील गोवर्धन मंडपे वय: 28 वर्ष राह.सिंधी (भोजापूर) ता.पवनी या विवाहित इसमाला विनयभंग केल्याप्रकरणी फिर्यादी युवतीच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिसांनीअटक केली आहे.

पवनी तालुक्यातील शिंदी (भोजापूर) गावातील युवती आपल्या बहिणी सोबत ब्रह्मपुरी येथील गांधीनगरात किरायाने राहत असून एका चप्पल दुकानात ती खाजगी नोकरी करते मात्र सिंधी (भोजापुर) तालुका पवनी येथील आरोपी स्वप्नील मंडपे हा त्यांच्या घराशेजारी राहत असून त्याचे लग्न झाले होते मात्र त्यांची पत्नी काही दिवसा अगोदर मरण पावली आहे . त्यामुळे सदर आरोपी या 22 वर्षीय युवतीकडे वारंवार लग्नाची मागणी करत होता.

फिर्यादी युवतीकडून त्याला विरोध होता तरी परंतु आरोपी ब्रह्मपुरी येऊन त्या युवतीला लग्न कर म्हणून धमकावीत होता त्यावरच न थांबता बळजबरीने तिचा विनयभंग करून शारीरिक सुखाची मागणी केल्याने फिर्यादी युवतीने आरोपी स्वप्निल मंडपे विरुद्ध ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. क्रं 65/2022 नुसार भांदवी कलम 354 , 354 (अ) , 452, 341, 504,506 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.