वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा योजनेची बैठक संपन्न !

38

🔹नवीन पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे दिले निर्देश !

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.17फेब्रुवारी):- येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाईने त्रस्त होणार असलेल्या गावातील ग्रामस्थांना तात्काळ पाणीटंचाईबाबत उपापयोजना करण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी व सर्व विभागाच्या प्रमुखांची पाणी पुरवठा योजनेची बैठक संपन्न झाली. वरुड मोर्शी तालुक्यात पाणी टंचाई बाबत आलेल्या समस्याचे निराकरण करण्याकरिता पाणी टंचाई भविष्यात निर्माण होऊ नये याकरिता अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिले.

प्रत्येक वर्षी अधिग्रहनाच्या भरवशावर न बसता कायमस्वरूपी सोर्स निर्माण करणे गरजेचे असून जल जीवन मिशन अंतर्गत टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव सादर करून कायमस्वरूपी सोर्स निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले. उन्हाळाच्या काळात पाणी टंचाई व मतदारसंघातील नागरिकांच्या पाणी पुरवठा बाबत असलेल्या तक्रारी व समस्या निराकरण करून त्वरित उपाययोजना करण्याचे व वरुड तालुक्यातील गावांच्या पाणी पुरवठा संदर्भात तक्रारी लवकर निकाली काढण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागाला दिले.वरुड तालुक्यातील पाणी टंचाईच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही. जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले जातील मात्र प्रत्येक ग्राम पंचायतीने सुचविण्यात येणार्‍या कामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. जेणेकरून प्रस्तावांना वेळेत मंजूरी मिळून कामेही वेळेत पूर्ण होतील अशा सुचना आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधितांना दिल्या.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील गावातील पानी वितरण व्यवस्था, पाण्याची नवीन टाकी, पाईप लाईन, इत्यादी कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. वरुड तालुक्यात पाणी टंचाईबाबत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. टंचाईबाबत अनास्था दिसून आल्यास कारवाईच्या सूचना दिल्या जातील. मोर्शी वरुड तालुका आधीच ड्राय झोन मध्ये असल्यामुळे पाण्याची भीषण समस्या आपल्या भागात आहे त्यामुळे पाणी टंचाईकडेच दुर्लक्ष करुन चालणार नाही. तालुक्यात एकही प्रस्ताव नामंजूर होणार नाही याबाबत अधिकार्‍यांनी दक्षता घेतली पाहिजे असे या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले .

वरुड तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई सन 2022 चा उन्हाळा संदर्भात आढावा व त्यावर उपाययोजना, “जल जीवन मिशन” अंतर्गत नवीन प्रस्ताव सादर करणे, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करणे, पेसा कायदा संदर्भात आढावा वृक्ष लागवड व MREGS कामा संदर्भात आढावा, महा आवास अभियान, ग्रामपंचायत विभक्तीकरण करणे या संदर्भात चर्चा करण्यात आली.नगर परिषद सभागृह वरुड येथे झालेल्या पाणी टंचाई आढावा बैठक आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी यावेळी आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, उपविभागीय अभियंता देशमुख, गटविकास अधिकारी पवार साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी कनाटे, यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे, पंचयात समितीचे अधिकारी वरुड तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक यांच्यासह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.