दलीत मित्र स्व.श्रीरामजी धोटे व स्व.कमलताई धोटे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.17फेब्रुवारी):-आधुनिक किसान शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालित कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सूरबोडी येथे शाळेचे मुख्य संचालक दलीत मित्र स्व. श्रीरामजी धोटे व त्यांच्या सहचारिणी संस्थेच्या सदस्या स्व.कमलताई धोटे यांच्या अर्धाकृती पुतळ्यांच्या अनावरणाच कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य.डॉ.देविदास जगनाडे यांनी दोन्ही वेक्तीच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला या कार्यक्रमाला स्व. श्रीरामजी धोटे यांचे मित्र श्री.नारायणजी बोकडे तसेच ऍडो.गोविंदराव भेंडारकर प्रा .अनिल कोडपे सर , माजी प्रा.दिगंबर पारधी सर,श्री नामदेवराव ठाकूर,श्री केडझरकर सर तसेच संस्थेचे सचिव प्रा. इसनजी देसाई व संस्थेचे पदाधिकारी , व मुले ,सुना, मुली,जावई,नातवंडे तसेच इसापूर इटखेडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते .उपस्थित सर्व पाहुण्यांचा प्रा.श्री.संदीप ढोरे सर,करणकर जी आणि त्यांची चमू यांनी शब्द सुमनानी स्वागत केले.

स्व.श्रीरामजी धोटे व स्व.कमलताई धोटे यांच्या जीवन चरित्रावर व कार्यावर सर्व मान्यवरांनी प्रकाश टाकला त्याच प्रमाणे पुतळा दान करणारी ku. श्वेता ज्योती व संजय धोटे हीचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.श्री धोटे सर कु.ज्योती मॅडम पिलारे सर कऱ्हाडे सर कू.भारती मॅडम व सर्व कर्मचारी व विद्यार्थानी परिश्रम घेतले.