🔹म.रा.मराठी पत्रकार संघाचा नवीन उपक्रम

✒️मनोज गाठले-शेगाव(बु),विशेष प्रतिनिधी

शेगाव बु. (दि.24 जून) ,वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथे महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा शेगाव च्या वतीने कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्या करिता स्थानिक शेगाव येथील पोलिस तसेच पोलिस कर्मचारी , सरपंच , सामाजिक कार्यकर्ते , तसेच आशा वर्कर्स याशिवाय शासकीय सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी , यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघ चंद्रपुर च्या वतीने शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ , सन्मान चिन्ह , सन्मानपत्र देऊन यांना गौरविन्यात आले।
आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव जनतेचे संरक्षण करुण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उन्हातान्हात उपश्या पोटी राहून जनतेची सेवा करणारे येथील ठानेदार श्री सुधीर बोरकुटे , व त्यांचे सहकारी श्री प्रवीण जाधव साहेब , यांना यावेळी गौरविन्यात आले , तसेच येथील वैद्यकीय अधिकारी सौ हिवरकर मैडम , नर्स सौ साखरे मैडम यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करून पुढील जीवनाच्या यशस्वी शुभेच्छा दिल्या .
या सोबतच गावकऱ्यांनच्या हिता साठी जनतेचे संरक्षण करणारे शेगाव चे प्रथम नागरिक श्री यशवंत राव लोडे , सरपंच ग्रामपंचयायत शेगाव बु यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला याच सोबत येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच टाइगर ग्रुप चंद्रपुर चे प्रमुख श्री अनिलभाऊ जाधव यांनी कोरोनाच्या महान युद्धात जनतेची सेवा केली, यामध्ये मजूरवर्ग , गरीब जनता , यांना त्यांच्याघरपर्यंत भोजन सह किराना ,अनाज सुद्धा त्यांनी पाठविले या सेवाभावी कामाची पावती म्हणून त्यांचा

यावेळी सत्कार करण्यात आला . याच सोबत येथील व्यापारी वर्गाचे प्रतिष्ठित नागरिक श्री मनोज राव बोनदगुलवार , व श्री बंडू भाऊ कोटकर अप्रत्यक्ष्य रित्या गोर गरीब जनतेला सर्व सुख सोई पुरवल्या त्या सोबतच त्यांच्या घरापर्यन्त अनाज ,किराना भाजीपला सुद्धा पुरवून जनतेची सेवा केली व अखेर येथील आशा वर्कर महिलांनी सुद्धा गावात अनेक मोलाचे कार्य करुन जनतेची उदात्त भावनेने सेवा केली अशा प्रकार उत्कृष्ठ कामगिरी करणारे कोरोना योद्धा महिला ,पुरुष यांचा संयुक्त रित्या मोठया थाटामाटात यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला तर यावेळी प्रत्येक कोरोना योद्धा ला शाल , सन्मान चिन्ह , पुष्पगुच्छ , सन्मानपत्र , व शुभेच्छा देऊन त्यांना गौरविन्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चंद्रपुर चे विदर्भ अध्यक्ष प्रा श्री महेश पानसे , जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ बोकडे , जिल्हाकार्याध्यक्ष श्री जीतूभाऊ चोरडिया , तसेच जिल्हा सरचिटणीस श्री राजूभाऊ कुकडे , प्रा श्री धनराज खानोरकर व वरोरा तालुकाचे कार्यकर्ते श्री प्रदीप कोहपरे आदि मान्यवर उपस्थित होते सदर हा कार्यक्रम येथील शाखा अध्यक्ष्य श्री मनोज गाठले यांच्या मार्गदर्शनात पार पडला व कार्यक्रमच्या यशस्विते साठी संगटनेचे सचिव श्री देवराव ढोके यांनी मोलाचे सहकार्य लाभले.

सांस्कृतिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED