ह‍दगाव येथे महसुल प्रशासनाची धडक कार्यवाही

33

🔺१ ट्रक्टर जप्त व ४ तराफे जाळुन केले नष्ट

✒️सिध्दार्थ वाठोरे(हदगाव प्रतिनिधी)

हदगाव(दि.23फेब्रुवारी):- तहसिलदार जिवराज डापकर यांच्या पथकाना मिळालेल्या गुप्ती माहितीवरुन दिनांक २२/०२/२०२२ रोजी अवैधरित्या रेती वाहतुक करणारा एक ट्रॅक्टर पकडुन जप्त केले. सदर कार्यवाही हि मा.उपविभागीय अधिकारी हदगाव श्री ब्रिजेश पाटील यांच्या आदेशानुसार व मा.तहसिलदार हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली गिते मंडळ अधिकारी, हदगाव, मुंगल तलाठी, लाडेकर तलाठी व ठाकरे तलाठी यांनी केली.

तसेच त्याच दिवशी दुपारी मा.श्री.जिवराज डापकर, तहसिलदार हदगाव यांनी मौ.हस्तरा येथिल पैनगंगा नदीकाढावर त्यांच्या पथकासह धाड मारली असता, त्यांना नदीकाढावर रेती उपसाकरिता वापरण्यांत येणारे ०४ तराफे आढळुन आले सदर ०४ तराफे त्यांनी जाळुन नष्ट केले आहेत. सदर कार्यवाही करतांना तहसिलदार, हदगाव यांच्यासोबत श्री.कवडगावे तलाठी, श्री.लाडेकर तलाठी, श्री.ठाकरे तलाठी, श्री.अरविंद शिंदे, पोलीस पाटील धानोरा, शेख रशिद, सुहास पाईकराव हे कर्मचारी उपस्थित होते.