सावली येथे मोफत मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

27

🔸सावली सोशल फाउंडेशनचा उपक्रम ५३२ रुग्णाची तपासणी, १७६ रुग्णाची शस्त्रक्रियेसाठी निवड

✒️अंगुलिमाल उराडे(तालुका प्रतिनिधी)

सावली(दि.23फेब्रुवारी):-सोशल फाउंडेशन व महावीर इंटरनॅशनल क्लब चंद्रपुर, ग्रामीण रुग्णालय सावली व सेवाग्राम रुग्णालयाच्या वतीने आज रविवार दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी, विश्वशांती विद्यालय सावली येथे भव्य विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळाला.आवश्यक असलेल्या रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया सेवाग्राम मेडिकल च्या तज्ञ डॉक्टरांकडून मोफत होणार असून त्याकरिता ५३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १७६ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली. त्यातील ५६ रुग्णांचा पहिला जत्था सेवाग्राम ला रवाना झाला. त्यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून अनेकांना मोफत आयड्रॉप देण्यात आले.

सावलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेच्या वतीने विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणीचा हा उपक्रम राबविला जातो आहे. त्याला वेळोवेळी उत्तम असा प्रतिसादही लाभतो. कोवीडमुळे गेल्या दोन वर्षापासून हा शिबिर बंद होता. त्यामुळे गावोगावातील अनेक जण या शिबिराच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे सावली फाऊंडेशन व महावीर इंटरनॅशनल क्लब चंद्रपुर च्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते‌. त्यावेळी महावीर इंटरनॅशनल क्लबचे नरपतचंद भंडारी, विदर्भ प्रांत अध्यक्ष दिलीप भंडारी, पंकज जैन, त्रिशूल बंब, आनंद जैन, संयोजक राजबाळ संगीडवार, प्रकाश खाजांची, मनोज ताटकोंडावार, संतप्रकाश शुक्ला, शंकर दिकोंडवार, अतुल लेनगुरे, प्रफुल बुटे, सुरज बोम्मावार, रवींद्र ताटकोंडावार, प्रवीण झोडे, संदीप मेडपल्लीवार, राहुल मेरूगवार, अजय पोटवार, महेश चौधरी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी महावीर इंटरनॅशनल क्लब चंद्रपुर व सावली सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात कोवीड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. तसेच सर्व नागरिकांसाठी मोफत मास्क वाटपही करण्यात आले.