वसमत रोडवरील श्री हरी साडी डेपोला लागली आग

32

✒️आनंद टेकुळे(प्रतिनिधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.23फेब्रुवारी):-शेहरातील वरमत रोड महामार्गवर असलेल्या एका साडीच्या होलसेल दुकानाल मंगळवारी रोजी सकाळी 5 च्या सुमोरास आग लागली.या आगीत दुकानातील साड्या वो इतर साहित्य जळून खाक झाल्या आहेत.जवळपास चार तासांनी ही आग आटोकन्यात आग्निशमन दलाला यश आले.वसमत रोडवरील ऋषिकेश सावंत यांचे श्री हरी डेपो हे होलसेल साडी चे कुप मोटा दुकान आहे.मंगळवारी सकाळी 5 च्या सुमोरास या दुकानातून धुर निघत होता.या रस्त्यावरून सकाळी फुरायला ये-जा करणाऱ्या नागरिकांना हा प्रकार दिसून आला.त्यानंतर काहींनी तात्काळ दुकान मालकासह आग्निशमन दलास संपर्क साधला, सकाळी 6 च्या सुमिरास आग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दखल झाले, तोपर्यंत या दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडत होते.

आग्निशमन दलाच्या जवानांनी या दुकानाचे शटर तिडून आग आटोकण्यात आणली.त्या दरम्यान या आगीत दुकानातील साडीच्या मालाचे कुप नुकसान झाले.माहिती घेता असे कळले कि ही आग शॉर्ट सर्किटने झाली.आग्निशमन दलासह वाहतूक शाखा पोलीस आणी नवा मोंढा पोलीस घटनास्थली हजर झाले.जवळपास 4 तासांनी ही आग आटोकण्यात आली. आग्निशमन दलाचे आधीकारी दिपक कानोडे, फायरमन देशमुख, मदन जाधव, डी. यू. राठोड,सर्जेराव मुंढे, एस.के.मौलाना, इनयात अली यांनी सहकार्य केले.