भाजपा सरकार ईडीला हातचे बाहुले बनवून देश हुकूमशाही कडे घेऊन जात आहे – विजयसिंह पंडित

31

🔹गेवराई तहसिलवर राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि. २५फेब्रुवारी):- सत्ताधारी भाजपा इडी आघाडीने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. आपल्या विचाराचे सरकार नसलेल्या राज्यात इडीच्या माध्यमातून गुन्हे दाखल करुन हुकूमशाही सुरु केली. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते ना. नबाब मलिक यांना कसलीही नोटीस न देता भल्या पहाटे त्यांच्या घरावर धाड टाकून त्यांना अटक करुन आपल्या हुकूमशाहीचा पुरावाच दिला आहे. केंद्रातील जबाबदार प्रशासकीय यंत्रणा असणाऱ्या ईडीला हातचे बाहूले बनवून भाजपा देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे असा घणाघात जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. मंत्री ना. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ गेवराई तहसिल कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

राज्य सरकारमधील जेष्ठ मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते ना. नवाब मलीक यांच्यावर केंद्र सरकारने सुडबुद्धीने तपास यंत्रणेमार्फत केलेल्या अटकेचा निषेध गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तहसिल कार्यालय गेवराई येथे तिव्र निदर्शने करुन केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये तपास यंत्रणामार्फत सुरु केलेल्या हुकूमशाहीचा तिव्र निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि.प. सभापती बाळासाहेब मस्के, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. एस.एस. पटेल, युवानेते रणवीर पंडित यांच्यासह शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, ईडीच्या धाडी टाकून भाजपा जनतेचा बुद्धीभेद करुन सामाजिक अशांतता पसरवत आहे. जेष्ठ नेते नबाब मलिक साहेबांवर केलेली कारवाई अतिशय चुकीच्या पद्धतीने केली आहे. भाजपाने कहर केला आहे, महाराष्ट्राची जनता आता हे सहन करणार नाही. भाजपाच्या हुकमशाहीचा हिशोब केला जाईल असेही ते म्हणाले. यावेळी भाऊसाहेब माखले, ऋषिकेश बेदरे, आनंद सुतार, नविद मशायक, फुलचंद बोरकर, कुमारराव ढाकणे, बाबासाहेब चव्हाण, शेख सलीम, दादासाहेब रोकडे, डॉ. एस.एस. पटेल आदींनी आपल्या भाषणामध्ये केंद्र सरकारचा आणि तपास यंत्रणांचा तिव्र निषेध केला.

यावेळी अक्षय पवार, दिपक आतकरे, शेख खाजाभाई, सोमनाथ गिरगे, गुफरान इनामदार, दत्ता दाभाडे, खालेद कुरेशी, मदन लगड, दिनेश घोडके, शांतीलाल पिसाळ, दत्ता पिसाळ, बंडु मोटे, आवेज शरीफ, अ‍ॅड. प्रदिप मडके, अ‍ॅड. योगेश पाटील, अ‍ॅड. कल्याणराव चव्हाण, अब्दुल हन्नान. रामेश्वर पवार, शेख मिनहाज, संग्राम आहेर, नितीन पवार, राजेंद्र वारंगे, माऊली नवले, अक्रम सौदागर, पाराजी मोटे, शेख समशेर, सय्यद नजीब, वचिष्ट शिंदे, विठ्ठल पवार, सरवर पठाण, शेख युनूस, जयसिंग माने, दिनेश घोडके, संतोष आंधळे, संदिप मडके, शेख बाबुभाई (जेके), मन्सुर शेख, रवि शिर्के, आकाश जाधव, अंकुश गायकवाड, मंगेश कांबळे, शेख रहीम, वैजिनाथ मासाळ, गोवर्धन ढेंगळे, राहुल गाडे, सतिष गाडे, शाम रुकर, वसीम फारोकी, माजेद कुरेशी, राजाभाऊ जवंजाळ, मोहसिन शेख, विशाल होनमाने, नईम बागवान, लखन पंडित, विष्णूपंत घोंगडे, बाळासाहेब दाभाडे, गणेश जगताप, धोंडिबा हातागळे, राम म्हेत्रे, गोवर्धन ढेंगळे, वैभव दाभाडे, प्रल्हाद दाभाडे, अमोल पिंगळे, रमेश खोपडे, विशाल भुंबे, वैजिनाथ सिरसट, अशोक दरेकर, बळीराम सुतार, अदित्य हातागळे, सुमित काळम, सय्यद सिराज, कृष्णा गळगुंडे, रवि दाभाडे, रामदास मुंढे, अमित वैद्य, जयसिंग माने, रमेश नेहरकर, परमेश्वर बारगजे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.