लढा हक्कासाठी ,लढा शेतकरी बांधवांसाठी साखळीउपोषणाचा पाचवा दिवस

24

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27फेब्रुवारी):-तहसील कार्यालया समोर डोंगरी जन परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यान्साठी गंगाखेड तहसील कार्यालयावर “बेमुदत साखळी आंदोलन” करण्यात येत असून आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.

*”एक दिवस एक गाव “* याप्रमाणे आज पिंपळदरी गावचे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
आंदोलनस्थळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर साहेब,गंगाखेड नगरीचे आमदार मा. रत्नाकरजी गुट्टे साहेब यांनी भेट देऊन सर्व शेतकरी बांधवांची आस्थेवाईकपणे चौकशी केली .व तसेच डोंगरी जन परिषदेच्या वतीने आदरणीय जानकर साहेबांना व मा.गुट्टे साहेबांना आपल्या मागण्यांचे निवेदन सुपुर्द केले.

आदरणीय गुट्टे साहेबांनी हया आपल्या सर्व मागण्या विधिमंडळात उपस्थित करण्याचे आश्वासन दिले.यावेळी डोंगरी जण परिषदेने मुख्य संयोजक श्री पंडितराव घरजाळे , संयोजक आश्रोबा दत्तराव सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर बालासाहेब प्रभाकर सोडगीर शंकर आण्णा रुपनर प्रकश मुंडे ,बालासाहेब मुंडे बंकट मुंडे ,गोपीनाथ मुंडे ,रामकृष्ण मुंडे,राजेभाउ शिंदे आतुल मुंडे गोपीनाथ भोसले ,बालासाहेब गुट्टे ,बाबुराव नागरगोजे ,जगन्नाथ मुंडे, विनायक दहीफळे आदी शेतकरी बांधवाची उपस्थिती होती.