त्रिरत्न अकॅडमी पिंप्री येथे १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

33

✒️पी.डी.पाटील सर(विशेष प्रतिनिधी)

धरणगाव(दि.27फेब्रुवारी):-पिंप्री खु येथील त्रिरत्न अकॅडमी येथे १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला . मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेची गोडी , तसेच अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आज अनेक ठिकाणी प्रयत्न होताना दिसतात यावर मनोगत दिले. तसेच आपल्या भाषेचा अभिमान बाळगत मराठी आम्ही सर्वदूर नेली पाहिजे यावर अकॅडमी चे संचालक सतिश शिंदे यांनी प्रकाश झोत टाकला.

विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शालेय प्रवास तसेच येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी , व भविष्यात उज्वल यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या वेळी संचालिका आम्रपाली शिंदे , तसेच माहेश्वरी बडगुजर , धनश्री बडगुजर , मुस्कान खाटीक , रोहन भालेराव , विवेक बडगुजर , प्रसाद बडगुजर , हर्षल बडगुजर , आर्यन तायडे, ज्ञानेश्वर साळुंखे , यशराज चौधरी , आदी उपस्थित होते.