सिरसदेवी येथे शेतीच्या वादातून विकोपाला, झोपेत असताना तलवारीने वार

28

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.27फेब्रुवारी):-तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये चुलत भावाभावामध्ये शेतीच्या जुन्या वादातून पहाटे घरी झोपेत असताना चुलत भावावर तलवारीने वार केले असता एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.२७) घडली आहे. तालुक्यातील सिरसदेवी येथील शेख समीर शेख अमीन (वय २५) हा आपल्या घरी झोपलेला असताना पहाटे एकच्या सुमारास शेख रईस शेख इसुफ, शेख अनिस, शेख इनुस इसुफ हे तिघे समीर शेखच्या घरी आले व त्यांनी शेतीच्या जुन्या वादाची कुरापत काढत समीर शेख याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

हा वाद वाढत जाऊन तो हाणामारीपर्यंत गेला असता वरील तिघांनी समीर शेखवर तलवारीने मानेवर, पायावर , पोटावर , हातावर वार करून गंभीर जखमी केले. यावेळी समीरच्या सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद याच्या गुडग्यावर वार झाले आहेत. तलवारीने वार करून तिघेही फरार झाले आहेत. सदरील घटना सिरसदेवी येथील बेंडकीच्या वड्या जवळील वस्तीवर घडली. जखमी समीरच्या आरडाओरडा ऐकल्यानंतर शेजारी धावत गेले असता समीर हा जखमी अवस्थेत असल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने शेख समीर याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रताप नवघरे यांनी दिली.