शब्दशृंगार साहित्य मंच (महाराष्ट्र) तृतीय वर्धापनदिनी घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहिर

34

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.27फेब्रुवारी):-साहित्य क्षेत्रात नावाजलेल्या शब्दशृंगार साहित्य मचांने पुन्हा बाजी मारली. नवोदीत साहित्यिकांचा हा मंच दिवसेंदिवस बहरत जात आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील समुहाचा तिसरा वर्धापन दिन आगळा वेगळा साजरा करण्यात आला. समुहात काव्यलेखन स्पर्धा राबवण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रील सारस्वतांनी सहभाग नोंदवला होता. तब्बल दोनशे सतरा रचनांचा प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेकरीता आयोजक मा.श्री.अनिल केंगार .सांगोल , मा.सचिन मुळे.परभणी , मा.सौ.रंजना मांगले.मुंबई साहित्यिक लाभले. तसेच परीक्षिका मा.सौ.आम्रपाली घाडगे मुंबई. ह्या होत्या!
स्पर्धेतील दोनशे सतरा पैकी पाच स्पर्धक विजेते ठरले , विजेते पुढील प्रमाणे..

सर्वोकृष्ट : कु.सौरभ हिरामण आहेर
उत्कृष्ट : पंकजकुमार उत्तम ठोंबरे
प्रथम : डॉ.जतिनबोस शंकर काजळे
द्वितीय : श्री.विकास उत्तमराव पालवे
तृतीय : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
सहभागी विजेत्यांना शील्ड व सन्मानपत्र पोष्टद्वारे वितरण करण्यात आले!

शब्दशृंगार साहित्य मंच (महाराष्ट्र) तर्फे मा.सौ.आम्रपाली घाडगे यांना साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत असल्याने “शब्दशृंगार गौरव पुरस्कार” शब्दशृंगारचे संस्थापक अध्यक्ष/गीतकार/एॅक्टर/साहित्यिक मा.विशाल पाटील वेरुळकर यांच्या हस्ते देण्यात आला!या वेळी सर्वांच्या शुभेच्छा वर्षाव समुहावर पडत होता. साहित्य क्षेत्रातील नावाजलेले साहित्यिक मा. नरेंद्र गुळघने , मा.दिलीप काळे , सचिन मुळे ,सौ. रंजना मांगले,बच्चुभाऊ गांवडे , अनिल केंगार , कविता वालावलकर , डॉ.दिनेश मोहरील , राजेंद्र बनसोड , हरिदास गौतम , सौ.शिवांगी वेरुळकर ,श्री. अंगद दराडे ,श्री.मोहनराव काळे , आदी सर्व साहित्यिक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या!तसेच नव नवीन उपक्रम तथा स्पर्धेचे आयोजन या समूहातर्फे घेण्यात येईल असे समुहाचे संस्थापक विशाल पाटील यांनी सांगितले.अशा पद्दतीने शब्दशृंगार साहित्य मंच (महाराष्ट्र) या समुहाचे नाव पुन्हा एकदा साहित्य क्षेत्रात उंचावले आहे!