तरुणाई जर अन्यायाविरुद्ध लढणारी असेल तर देश नक्कीच बदलणार

28

🔸प्रा. सुषमा पाटील यांचे प्रतिपादन…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

तुमसर(दि.27फेब्रुवारी):-विध्यार्थ्यांनो, आपली मराठी भाषा ही,आपल्या साठी खुप महान आहे. ही भाषा आपल्याला का बरं आवडते?? ही भाषा आपल्याला सोपी का बरं वाटतं ?? त्या भाषेत आपल्याला चांगले गुण का बरं मिळतात ?? कारण ती आपली मातृभाषा आहे आणि आपलं त्या भाषेवर खरं प्रेम आहे. आणि ती भाषा आपल्याला बोलायला सुंदर वाटते, ऐकायला मधुर वाटते.. आणि घरातील कोणत्याही सदस्यांसोबत किंवा समाजातील कोणत्याही व्यक्ती सोबत वा कुठेही बोलत असताना मराठीतच बोलल्यावर मनाला खूप समाधान मिळत असते.

तसेच आपल्या आयुष्यात आपले आदर्श व्यक्ती असणं खूप गरजेचे आहे.. आपले जे आदर्श राहतात त्यांचे कार्य करण्याची पध्दत किंवा ते जसं अन्यायाविरुद्ध लढतात ज्या पध्दतीने ते कार्य करत राहतात तसंच त्यांच्या सारखंच आपण देखील केलं पाहिजे. निव्वळ त्यांची फोटो लोगो आणि डि.पी ठेवून काही अर्थ राहत नसते तर त्यांच्या सारखे कार्य करण्याचे सामर्थ्य हे आपल्या अंगी असले पाहिजे. तेव्हाच जीवनाला खरा अर्थ राहत असते.सध्या च्या परिस्थितीत जर जगाला किंवा देशाला बदलवायंच असेल तर तरुणाई हा घटक खूप महत्त्वाचा आहे.तरुणाई जर अन्यायाविरुद्ध लढणारी असेल तर देश नक्की बदलणार.. पण निव्वळ म्हणून काही उपयोग नाही तर तसं आचरणात आणुन ते करून दाखवायला हवं.. असे प्रतिपादन एम आर कॉलेज गडहिंग्लज येथील प्रा.सुषमा पाटील यांनी केले.

स्थानिक विद्यार्थी अभ्यास मंडळ तुमसर आणि माझी माय सरसोती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा दिन.. तथा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्या ऑनलाइन बोलत होत्या!
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. संजय लेनगुरे यांनी मराठी भाषेचा महिमा. सुंदर अशा मनमोहक चारोळ्या मधून व्यक्त केलेला आहे तसेच ऑनलाइन मार्गदर्शन सत्राची आवश्यकता का आहे! याबद्दल आपले मत प्रतिपादन केले.

कार्यक्रमात तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. ज्ञानेश हटवार, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघांचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंथन बडवाईक, युगेश बारागौणे यांनी तर आभार कु. जानवी ठवकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, अमेय भुरे, धीरज पडोळे, राहुल कटरे, अंशुल हरिणखेडे, प्रगती अवथरे, अंजली खेडकर, प्रगती भट, काजोल उके, रचिता पारधी, पायल मेश्राम,अंजली कनोजे, कशिष मते, गुलशन गोपाले, कुणाल बांडेबुचे, करण ढोबरे, प्रणय कुंभलवार, प्राची पटले, दामिनी पटले, श्रद्धा गोले, महेक पठाण शितल ठाकूर सानिया शेख, शुभांगी कीरपाने, अपेक्षा अथीलकर यांनी सहकार्य केले.