विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे शिव जन्मोत्सवाचे आयोजन

31

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.28फेब्रुवारी):-शिवजयंतीच्या पुर्व दिनी १९/०२/२०२२ रोजी विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे कला व सांस्कृतिक मंडळ आणि भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाराजांचा जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलका अनंत भिसे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुचिता खोडके(IQAC समन्वयक ) आणि वक्ते म्हणून डॉ. दशरथ काळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. सर्वप्रथम जयश्री सोळंके हिने सुंदर स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले. तर सचिन झिमटे यांनी शिव घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे वक्ते डॉ. दशरथ काळे यांनी शिवाजी महाराजांचा अपरिचित इतिहास विद्यार्थ्यांसमोर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये मांडला. प्राध्यापक राजीव तायडे यांनी अफजलखानाचा वध हा पोवाडा सादर केला. प्राचार्य डॉ. अलका भिसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिवाजी महाराज युवकांचे कायम प्रेरणास्थान राहिले आहेत. आजच्या संघर्षाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांमध्ये रुजणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक रुपेश फुके यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राजीव तायडे यांनी केले. सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मराठमोळा वेश परिधान करून कार्यक्रमांमध्ये उस्फुर्त सहभाग घेतला.

अश्याप्रकारे कार्यक्रमांमध्ये पोवाडा, शिव घोषणा, गीत, व्याख्यान आणि मराठमोळी वेशभूषा अशा विविध कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उल्हासाने साजरा केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राजीव तायडे, सहसमन्वयक प्राध्यापक रुपेश फुके, सचिव डॉ. गजेंद्रसिंग पचलोरे, भाषा मंडळातील सर्व विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.