मायबोलीचे संवर्धन केले पाहिजे-प्रा. तुफान अवताडे

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27फेब्रुवारी):-स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स, अँड सायन्स ब्रह्मपुरी येथे मराठी भाषा व साहित्य विभागाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिवस (कवी कुसुमाग्रज )यांची जयंती) साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचेअध्यक्ष मराठी विभाग प्रमुख डॉ.जगदीश मेश्राम, प्रमुख वक्ते सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक के. एस.मेश्राम होते .याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी सांस्कृतिक मूल्य जोपासन्यासाठी आपल्या बोली भाषेचा उपयोग करणे अतिशय महत्वाचे आहे. जोपर्यंत बोलीभाषा टिकणार नाही तोपर्यंत कोणतीही भाषा समृद्ध होऊ शकत नाही असे विचार व्यक्त केले.

याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी काव्यवाचन व कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगदीश मेश्राम यांनी मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर सर्वांनी भाषेचा उपयोग जीवन व्यवहारात वारंवार केला पाहिजे , तरच भाषा टिकू शकेल असा आशावाद व्यक्त केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के .एस. मेश्राम यांनी केले कार्यक्रमाचे संचालन श्री गोपाल दिघोरे यांनी तर आभार अभ्यास मंडळाचे अध्यक्ष चेतन खोब्रागडे यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.