“डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड आणि बौद्ध स्मशानभूमीमधील सार्वजनिक मागण्या त्वरित पूर्ण करा” – सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष)

55

🔹8 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत उपोषणा चा इशारा

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.10मार्च):-शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डमधील तसेच बौद्ध समाजाची एकमेव असलेली बौद्ध स्मशान भूमीतील सामाजिक व सार्वजनिक मागण्या आजपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत.दलित व मागासवर्गीय वस्ती असल्यामुळे उमरखेड नगर पालिका प्रशासन जाणून बुजून या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.असा आरोप अर्जदार सिद्धार्थ दिवकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड) यांनी केला आहे.मागील अनेक वर्षांपासून खालील मागण्या करण्यात आल्या आहेत- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सार्वजनिक वाचनालय जीर्ण झाल्यामुळे ते पाडून नवीन वाचनालय आणि ग्रंथालय बांधून देण्यात यावी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातील नाल्यांची नूतनीकरण करण्यात यावी.

वार्डमधील सर्वाचं सिमेंट रोडवर पिवर ब्लॉक (चेकर्स) बसविणे, माजी. नगरसेवक प्रकाश दुधेवार यांच्या घरामागील नाली पूर्ण बांधून देणे,बौद्ध समशानभूमी मधील सिमेंट रोड हा निष्कृष्ट दर्जाचा बनविला आहे तो नवीन तयार करून देणे,बौद्ध समशानभूमी मधील बैठक व्यवस्था (स्टेडियम) च्या पायऱ्यावर फरश्या बसविणे,बौद्ध समशानभूमी मधील बर्निंग शेड मध्ये सरण जाळी बसवणे, बौद्ध समशानभूमीच्या वॉल कंपाउंड ला रंगरंगोटी (कलरिंग) करणे,बौद्ध समशानभूमी मध्ये मोठा हाय मॅक्स एलईडी लाईट बसवणे.

इत्यादी सामाजिक व सार्वजनिक मागण्यांचे निवेदन मा. मुख्याधिकारी साहेब (न.प उमरखेड) यांना सादर करण्यात आले.सादर मागण्या 8 दिवसात पूर्ण करण्यात यावा.अन्यथा भीम टायगर सेना व सामान्य नागरिकांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल.असा इशारा निवेदनात दिला आहे.यावेळी निवेदनकर्ते सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना उमरखेड), प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते), माही धुळेकर, दिलीप कांबळे, विजय दिवेकर इत्यादी अनेक समाज बांधव उपस्थित होते.