आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

29

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔹क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री- विवेक बोढे

चंद्रपूर(दि.11मार्च):-गुरुवार 10 मार्च रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाच्या अग्रणी होत्या. त्या पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका होत्या ,त्यांचा जन्मदिन स्त्री मुक्ती दिन म्हणून पाळण्यात येतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री होत्या. लहान पणा पासून त्यांनी अक्षरांची ओळख करून घेतली व साक्षर झाल्या.महात्मा फुले यांनी पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरु करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा फुले यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले, नंतर शिक्षिका म्हणून शाळेवर नेमणूक केली. तेव्हा शाळेत जाऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींना शिकवू लागल्या.

मात्र त्या शिकवायला शाळेत जात असतांना लोकांनी त्यांना त्रास दिला, लोक त्यांच्या अंगावर चिखल शेण फेकीत दगड मारीत होते, तरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपले काम निष्ठेने केले त्यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी उपसरपंच संजय तिवारी, भाजपाचे विवेक तिवारी, राजेश मोरपाका, श्रीकांत सावे, श्रीकांत आगदारी, नरेंद्र थेरे, विनोद उईके, लता आवारी, शीतल कामतवार, भारती परते, स्वाती गंगाधरे, खुशबू मेश्राम, स्नेहा कुम्मरवार, कुमकुम वर्मा, अजय लेंडे, उमेश दडमल उपस्थित होते.