गंगाबाई तलमले महाविद्यालयाचे रा.से.यो. विशेष शिबिर चोरटी येथे संपन्न

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14 मार्च):- स्थानिक गंगाबाई तलमले कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रम्हापुरीचा रा.से.यो. विशेष शिबिर दत्तक ग्राम चोरटी येथे नुकताच पार पडला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रनिर्माणाकरिता युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित शिबिराचे उद्घाटन दि. 7 मार्च रोजी सार्वभौम ग्रामसभा भवन चोरटीच्या प्रांगणात घेण्यात आला.या प्रसंगी उद्घाटक म्हणून मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, अध्यक्ष म्हणून प्रा. तुळशीराम तलमले उपाध्यक्ष, रयत बहुउद्देशिय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी, तर विशेष अतिथी म्हणून जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर हे उपस्थित होते.

तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रयत बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राकेश तलमले व प्रमुख अतिथी म्हणून सरपंच निशा अमर मडावी , सुनीताताई वलके पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आशाताई चंदनखेडे, प्राचार्य मंगेश देवढगले आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्घाटक मिलिंद शिंदे म्हणाले की, प्रामाणिक मेहनत हेच यशाचे गमक आहे. शिबिरांतर्गत विविध बौद्धिक कार्यक्रम घेण्यात आले, त्यात गटविकास अधिकारी प्राजक्ता भस्मे, ॲड. वैशाली दर्वे, डॉ. मोनाली तलमले, प्रा. सुप्रिया तलमले, तालुका कृषी अधिकारी पी. डी. खंडारे, पत्रकार गोवर्धन दोनाडकर, राहुल मैंद, महेश पिलारे आदीचे मार्गदर्शन लाभले.

शिबिराचा समारोपीय सोहळा सार्वभौम ग्रामसभा भवन चोरटीचे अध्यक्ष मोरेश्वरजी उईके यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राकेश तलमले, अध्यक्ष, रयत बहुउद्देशिय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी हे होते. मार्गदर्शक म्हणून नुर पठाण शिक्षणाधिकारी, चंद्रपूर हे होते, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून सरपंच निशाताई अमर मडावी ,सदस्य आशाताई चंदनखेडे, पोलीस पाटील सूनिताताई वलके, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष राजेश्वर खरकटे, प्राचार्य मंगेश देवढगले, प्रा. श्रीकांत कडस्कर आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी नूर पठाण म्हणाले की, अशा शिबिरातून युवकात नैतिक मूल्य रुजविली जातात. हेच नीतिमान युवक पुढे राष्ट्रनिर्मितीत महत्वपूर्ण योगदान देतात. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. राकेश तलमले म्हणाले की, रा.से.यो. शिबिर महाविद्यालयीन युवक व खेडे यांना जोडणारा दुवा आहे. विद्यार्थ्यांमध्ये सेवेचा भाव निर्माण निर्माण करण्यात रा.से.यो ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व अहवाल वाचन सहकार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष पीलारे यांनी तर संचालन प्रा. गणेश दोनाडकर व आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश देवढगले यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रा. जयगोपाल चोले, प्रा. ओमादेवी बुराडे, प्रा. डिंपल तलमले, प्रा. तृप्ती नागदेवते, विद्यार्थी प्रतिनिधी सुनील पारधी व पायल ठाकरे , सहकारी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, ग्रामस्थ व शिबिरार्थी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.