नगर परिषद च्या निवडणूक पुढे ढकल्या मुळे गंगाखेड येथील इच्छुकांचे स्वप्न भंगले!

101

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधि)

गंगाखेड(दि.16मार्च):-नगर परिषद कार्यालय समोर 10 मार्च रोजी प्रारूप प्रभाग रचनेचा फलक लावण्यात आला असता या ठिकांनी इच्छुकांची गर्दी दिसून येत होती .जो तो आपला प्रभाग कसा झाला आहे ,कोणचा भाग कटला गेला आहे व नवीन भाग कोणचा जोडला गेला आहे तसेच यावर हरकती प्रक्रिय सुरु झाली असता राज्य शासनाने प्रभागाच्या सिमा निश्चित् करण्या बाबतचा नवीन आदिनियम मंजूर केला यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे शासनाच्या नवीन आदिनियम तरतूदी नुसार 10 मार्च ची प्रभाग रचना रद्द झाली.

असल्या मुळे निवडणुका पुढे गेल्यामुळे इच्छुकांचे स्वप्न भंगले .राज्य शासनाचा नवीन कायदा ओबीसी आरक्षण विना निवडणूक घेण्या बाबतचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा मुळे निवडणूक बाबत गोंदळ होता.परंतु राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचना,प्रभागाच्या सिमा,निश्चित अधीकारा बाबत कायदा केला.या मुळे 10 मार्चला जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द् झाली या नवीन निर्णयामुळे निवडणूक पुढे लोटली गेली या मुळे नगर परिषद वरील प्रशासकीय राजवट वाढणार हे निश्चित.