उन्हाळी सुट्टी व मौसमानिमित्त नागपूर मडगांव नागपूर साप्ताहिक रेल्वेसेवा कायमस्वरूपी सुरू करा

30

🔹महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटने शेगांवचे रत्नागिरी व रायगड जिल्हाध्यक्ष श्री वैभव बहुतूले यांची डिव्हिजन रिजनल मॅनेजर श्रीमती ॠचा खरे यांच्याकडे मागणी…    

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.19 मार्च):-आगामी उन्हाळी सुट्टी मौसमच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकण व विदर्भात येण्या-जाण्यासाठी मध्य रेल्वे गाडीच्या  फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 9 एप्रिल रोजी या रेल्वे गाड्या सुटणार असुन धामणगांव थांबा असल्याने नागपूर ते मडगांव कोकणात जाण्यासाठी गाडी उपलब्ध झाली आहे .01201 नागपूर रेल्वे स्थानकावरून 15.50 वा सुटेल व दुसर्‍या दिवशी मडगांव येथे 17.30 पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता  01202 ही विशेष गाडी 10 एप्रिल रोजी मडगांव स्थानकावरून 20.15 वा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 20.10 वा नागपूर येथे पोहोचेल. 

या रेल्वे सेवेला वर्धा,धामणगांव,बडनेरा जं,अकोला जं,भुसावळ जं,मनमाड,नाशिक रोड,इगतपुरी,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,माणगांव,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,राजापुर रोड,वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग नगरी,कुडाळ रोड,सावंतवाडी रोड,थिवीम स्थानकावर  थांबणार आहे सदर 01201/01202 नागपूर मडगांव नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वे व्दितीय वर्ग,तृतीय वर्ग वातानुकूलित वर्ग,शयनयान वर्ग पुर्णपणे आरक्षित 9 एप्रिल ते 12 जुन पर्यंत चालवण्यात येणार आहे।या रेल्वे सेवेला कायमस्वरूपी सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटने शेगांवचे रत्नागिरी व रायगड जिल्हाध्यक्ष श्री वैभव बहुतूले यांनी डिव्हिजन रिजनल मॅनेजर श्रीमती ॠचा खरे यांच्याकडे करण्यात आली होती…

         सदर या रेल्वे सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई गृपचे संस्थापक अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर,महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना शेगांव गृपचेचे अध्यक्ष राजकुमार व्यास,प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल,रत्नागिरी रायगड जिल्हाध्यक्ष श्री वैभव बहुतूले,सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ओमकार उमाजी माळगांवकर,दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर,मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी,पेण संपर्कप्रमुख हर्षद भगत,कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,पेण प्रवासीवर्ग,कृषी अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार व नोकर वर्ग यांच्याकडून करण्यात येत आहे.