विक्रम काटकपुरे एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण

48

🔸सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड

🔹सर्वत्र होत आहे अभिनंदन

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.25मार्च):-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या “सहायक मोटार वाहन निरीक्षक” परीक्षेचा नुकत्याच निकाल जाहिर झाला. त्यामध्ये चि. विक्रम बाबाराव काटकपुरे , यांची निवड झाली. विशेष म्हणजे २०१७ ला ८३३ जागा असताना काही मार्क ने निवड गेली. नंतर 2018 ला त्याचे वडील हार्ट अटॅक ने वारले. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली सोबतच त्याच्यावर घरची आणि बहिणीची लग्नाची जबाबदारी आली त्यात त्याच्या घरी कणभर जमीन सुद्धा नाही स्वतःचं मालकीचं घर पण नाही भाड्याच्या घरात राहतो.

नंतर 2020 मध्ये ॲड आली. त्यांमध्ये “सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक” पदी निवड झाली. त्याने ‘घरीच अभ्यास करून’ जिद्द व चिकाटीच्या जोरावर संपन्न केले. त्याबद्दल श्री.नयन प्रमोदराव कणसे(संचालक) संत गाडगेबाबा अभ्यासिका नांदगाव खंडेश्वर यांनी त्यांच्या घरी जाऊन “शाल श्रीफळ” देऊन सत्कार केला. त्यावेळेस त्याची आई संगीता बाबाराव काटकपुरे, बहीण कोमल बाबाराव काटकपुरे, लहान बहीण मेघा बाबाराव काटकपुरे आणि अंकुश कणसे उपस्थित होते.