राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाज मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित राहावे – अँड. राजेंद्र बन

103

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ. सरस्वती लाड)

आष्टी(दि.31मार्च):- गोसावी समाज परिषद बीड आयोजित राज्यस्तरीय समाज मेळावा व बीजहोम महायज्ञ संस्कार चे आयोजन दिनांक २ एप्रिल (गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर) रात्री ९ वाजता आशिर्वाद मंगल कार्यालय सोमेश्वर मंदिराजवळ बार्शि रोड बीड येथे करण्यात आले असून दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी राज्यस्तरीय मेळाव्यात समाज रत्न पुरस्काराचे वितरण, गुणवंत विद्यार्थी निवृत्त कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार असून महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचे प्रबोधनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. एकल गरजु महिलांना शिलाई मशिनचे वाटप तसेच राज्यभरातील २०१ समाज बांधवांच्या बीजहोम संस्काराचे ही आयोजन करण्यात आलेले आहे.

राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महंत महेशानंद गिरीजी दिल्ली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच उद्घाटक म्हणून मा. ना. धनंजयजी मुंडे पालकमंत्री बीड मा, जयदत्त अन्ना क्षीरसागर माजी मंत्री बीड मा. प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे खासदार बीड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तसेच राज्यातील दशनाम गोसावी समाज संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक व जिल्हा प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बीजहोम महायज्ञ चे प्रमुख उद्घाटक म्हणुन मा. आमदार संदिप भैया क्षिरसागर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध महंत चिंतामणी भारती गुरु धनराज भारती माहूर गड संस्थान महंत ह. भ. प. महादेव महाराज चाकरवाडीकर महंत ह. भ. प. श्री नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी, महंत संतोष गिरी महाराज शिखर शिंगणापूर यांच्या पावन सानिध्यात व महंत शुक्ल भारती महाराज मुंगसवाड संस्थान यांच्या गुरु आशीर्वादाने हा बीजहोम महायज्ञ चालणार आहे. श्रीमहंत दत्तात्रय महाराज गिरी आम्हा वाहेगाव यांच्या नेतृत्वात बीजहोम महायज्ञ होणार आहे. तसेच मराठवाडा महासंघाचे अध्यक्ष संपत भाऊ पुरी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अॕड. राजेंद्रजी बन यांच्या उपस्थितीत होणार आहे.

यासाठी जिल्ह्यातील प्रसिध्द महंत ह. भ. प. रामगिरी महाराज धोंडराईकर, महंत महादेव महाराज (पांगरीकर) महंत ज्ञानेश्वर गिरी (धोंडराईकर) महंत विजय गिरी( शिरूर का.) ह. भ. प. रामानंद महाराज पुरी, महंत भागवत महाराज (मनुबाई जवळा) ह. भ. प. विक्रम महाराज पुरी (गुंतेगा) ह. भ. प. मधुकर भारती महाराज (तिप्पटवाडी संस्थान) ह. भ. प. महादेव महाराज (जालना) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बिजहोम महायज्ञापुर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुण सोमेश्वर मंदिर बार्शी रोड पर्यंत आद्य शंकराचार्य व धर्मध्वज मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी दशनाम गोसावी समाजाचा राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात समाज संघटनांची बीड जिल्ह्यात मुहर्तमेढ ज्यांनी रोवली असे मा. गंगाधरजी पुरी यांचा भटके विमुक्त संघटन कार्याबद्दल महा. सन्मान समाज बांधवा मार्फत करण्यात येणार आहे. समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये महंत भरत महाराज भिंगोलीकर ( लातूर), मा. नारायण गोसावी (निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश) मुंबई, मा. मुन्ना गिर गोसावी (शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे पिता) पंढरपूर, मा. पंडित गोसावी पुणे, मा.अॕड. जगदेव गिरी परभणी, मा.नवनाथ बन (एबीपी माझा न्यूज रिपोर्टर), युवा व्याख्याते अविनाश भारती, मा. मनोहर गिरी गेवराई, राहुल गिरी महाराष्ट्रातील प्रसिध्द युवा व्याख्याता, मा. सुनिल गोसावी पोलीस प्रशासनातील अधिकारी.ठाणे, मा. कैलास भारती साहेब, मा. विवेकानंद गिरी ग्रामसेवक बीड, मा.प्राचार्या रमा गिरी जिल्हा रुग्णालय बीड तसेच स्वर्गीय दादासाहेब बन यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन समाज बांधवांच्या वतीने त्यांच्या पत्नी मिनाताई दादासाहेब बन यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच दशनाम गोसावी समाजातील वैद्यकिय, अभियंता प्रशासकीय सेवेत सामिल झालेल्या गुणवंताचा, निवृत्त कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.सदरील मेळाव्यास राज्यातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी, संस्थापक अध्यक्ष अॕड. राजेंद्र बन, विश्वंभर गिरी (जिल्हाउपाध्यक्ष), युवा अध्यक्ष गोविंद पुरी, जिल्हा संघटक राजेंद्र पुरी, युवा उपाध्यक्ष रवी बन, कार्याध्यक्ष अरुण भाऊ पुरी भारतपुरी (संपर्कप्रमुख) महिला अध्यक्षा मनिषा भारती, केज तालुकाध्यक्ष सचिन गिरी, पाटोदा बबन गिरी, अंबाजोगाई निरंजन गिरी, दामोदर गिरी, चंदन महाराज गिरी उत्तरेश्वर गिरी, बीड तालुका अध्यक्ष बाजीराव गिरी, धारूर आसाराम गिरी, वडवणी महादेव पुरी, माजलगाव गुरुदत्त गिरी, गोरख पुरी, परळी उल्हास भारती, शिरूर विजय गिरी, गेवराई कॅप्टन प्रभाकर गिरी, कर्मचारी प्रतिनिधी युवराज गिरी सर, गिरी, नाना पर्वत, ऋषी गिरी, शैलेश गिरी, प्रकाश गिरी यांनी केले आहे.